नवी दिल्ली : मागील एका वर्षांपासून मराठी नागरिकांसाठी बंद केलेले जुने महाराष्ट्र सदन आता 'महाराष्ट्र हाऊस' या नवीन नावाने सुरू केले जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून प्राप्त झाली आहे. नवीन महाराष्ट्र सदन कार्यान्वित झाल्यापासून जुने सदन बंद आहे. डागडुजी करण्याचे कारण सांगून जुने सदन लोकांसाठी बंद करण्याचा निर्णय निवासी आयुक्त बिपीन मलिक यांनी घेतला होता. मात्र डागडुजीच्या कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. निवासी आयुक्तालयातील सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कोपर्निकस मार्गावरील जुने महाराष्ट्र सदन 'महाराष्ट्र हाऊस' या नवीन नावाने पुन्हा सुरू करण्याची तयारी राज्य शासन करीत आहे.
जुन्या सदनाचे नाव १९६0 मध्ये 'महाराष्ट्र हाऊस' असेच होते. परंतु पुढे १९६५ मध्ये महाराष्ट्र सदन असे नाव देण्यात आले. याबाबत निवासी आयुक्तांना माहिती देण्यात आली असल्याचेही समजते. निवासी आयुक्त मलिक यांनी डागडुजीसाठी जुने सदन मागील एका वर्षांपासून बंद ठेवले आहे. मात्र जुन्या सदनची डागडुजी करण्याच्या कामाला अद्याप सुरुवात झाल्याचे दिसून येत नाही. शिवसेनेच्या खासदारांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव भगवान सहाय यांच्या नेतृत्वात नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीने बुधवारी जुन्या सदनाची पाहणी केली. निवास आणि जेवणाची नीट व्यवस्था करून जुने सदन नव्या जोमाने सुरू करण्याचा सरकारचा इरादा आहे. दरम्यान, सदनची चौकशी पूर्ण झाली नसून समितीचे अध्यक्ष भगवान सहाय पुढील आठवड्यात आणखी एकदा येणार असल्याचे समजते. नवीन महाराष्ट्र सदनातील कँटीनचे कंत्राट आयआरसीटीसीला दिले होते. आयआरसीटीसीच्या कर्मचार्यांनी उपाहारगृहातील सर्व साहित्य घेऊन पसार झाले असल्याचेही समजते.