‘महानंद’ला माहिती अधिकार लागू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 August 2014

‘महानंद’ला माहिती अधिकार लागू

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध उत्पादक महासंघ अर्थात महानंदला माहितीचा अधिकार लागू असल्याचे मुंबईच्या विभागीय माहिती आयुक्तांनी स्पष्ट केल्याने माहितीच्या अधिकारात महानंदच्या कार्यपद्धतीची माहिती उपलब्ध होणार आहे. 
महानंद संस्था माहिती अधिकाराच्या कक्षेत येत असून महिन्याभरात या संस्थेने जन माहिती अधिकारी आणि अपिलीय माहिती अधिकारी नेमावेत, असे आदेश या संस्थेला देण्यात आले आहेत. महाराष्ट्र दूध वितरक व वाहतूकदार संघटनेचे अध्यक्ष नाईक यांनी माहितीच्या अधिकारात या संस्थेची माहिती मागवली होती. त्यावर महानंदने जुजबी माहिती देत अधिक माहिती देण्याचे नाकारले होते. परिणामी, नाईक यांनी यासंदर्भात मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्याशी संपर्क साधला. 

त्यानंतर त्यांनी आवश्यक ती सर्व कार्यवाही करीत महानंद ला माहितीचा अधिकार लागू होत असल्याचा निर्णय दिला होता. महानंदने मुख्य आयुक्तांच्या या निर्णयाला आक्षेप घेत मुंबई हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने मुख्य माहिती आयुक्त गायकवाड यांचा निर्णय रद्दबादल ठरवीत यासंदर्भात मुख्य आयुक्तांना पुन्हा सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. मुंबई विभागाचे माहिती आयुक्त ए. के. जैन यांच्या नेतृत्वाखाली गेले दोन महिने यावरस सुनावणी झाली. दोन्ही बाजूकडून सविस्तर माहिती ऐकून घेतल्यानंतर महानंदला माहितीचा अधिकार लागू होतो, असा निर्णय दिला आहे.

Post Bottom Ad