मुक्त विद्यापीठाच्या प्रवेश मुदतीत २३ ऑगस्ट पर्यंत वाढ ! - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 August 2014

मुक्त विद्यापीठाच्या प्रवेश मुदतीत २३ ऑगस्ट पर्यंत वाढ !

नाशिक :  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांची प्रवेश प्रक्रिया (शैक्षणिक वर्ष २०१४-१५) राज्यभरातील विविध अभ्यासकेंद्रांवर सुरु आहे. विभागीय केंद्र, अभ्यासकेंद्र तसेच विद्यार्थांच्या सततच्या मागणीमुळे मुक्त विद्यापीठाने आपल्या विविध शिक्षणक्रमांच्या प्रवेशाची मुदत २३ ऑगस्ट २०१४ पर्यंत वाढवली आहे.

अनेक दहावी / बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पारंपरिक विद्यापीठात अद्याप प्रवेश मिळू न शकल्याने विद्यार्थ्यांच्या मागणीवरून पूर्वतयारी, बी.ए. / बी.कॉम. व इतर शिक्षणक्रमांसाठी ही मुदत वाढविण्यात (कृषी/एम.कॉम./ गांधी विचार दर्शन आणि मानवी हक्क प्रमाणपत्र हे शिक्षणक्रम वगळून) आली आहे. विद्यार्थ्यांना आता महाराष्ट्रातील ४००० हुन अधिक विद्यापीठ अभ्यासकेंद्रावर २३ ऑगस्ट २०१४ पर्यंत विनाविलंब शुल्कासहित तर निर्धारित केलेल्या विलंब शुल्कासह २४ ते ३० ऑगस्ट पर्यंत प्रवेश घेता येईल. प्रवेश माहितीपुस्तिका विद्यापीठाच्या http://ycmou.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर उपलब्ध असून विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी आपल्या विभागीय केंद्राशी अथवा अभ्यासकेंद्राशी संपर्क साधावा असे आवाहन विद्यापीठाच्या विद्यार्थी सेवा विभागाचे प्रभारी संचालक प्रा. प्रवीण घोडेस्वार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

Post Bottom Ad