निराधार व देवदासी महिलांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

04 August 2014

निराधार व देवदासी महिलांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचा इशारा

मुंबई : गेल्या कित्येक वर्षांपासूनच्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता होत नसल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र निराधार व देवदासी महिला संघटनेच्या वतीने आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. संघटनेच्या वतीने शेकडो महिला येत्या १७ ऑगस्ट १४ रोजी दिल्लीत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या घरासमोर तसेच मुंबई मंत्रालय आणि मुंबईत अन्य ठिकाणी निषेध म्हणून एकाच वेळी आत्मदहन करणार आहे. 
तीन वर्षांपूर्वी सोमय्या मैदानात संघटनेचे अध्यक्ष विलास रुपवते यांच्या नेतृत्वाखाली दुर्बल घटकांच्या 'वचनपूर्ती' मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी राज्यातील विधवा, निराधार, परित्यक्ता, देवदासी, आराधी, जोगती, वाघ्या-मुरळी आदी लाखोंच्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष मणिकराव ठाकरे, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश आणि माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक आदी उपस्थित होते. दुर्बल घटकांच्या विविध मागण्या मंजूर करून न्याय मिळवून देऊ, असे आश्‍वासन त्या वेळी देण्यात आले. मात्र हे आश्वासनं कधीही पाल्म्यात आलेले नाही परिणामी, संघटनेच्या वतीने आत्मदहन करण्याचा इशारा उपाध्यक्ष आशा पवार यांनी दिला आहे. 

Post Bottom Ad