एलटीटी ते करमाली दरम्यान मरेच्या ६ प्रीमियम एक्स्प्रेस - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 August 2014

एलटीटी ते करमाली दरम्यान मरेच्या ६ प्रीमियम एक्स्प्रेस

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने जादा गाड्या सोडल्या आहेत; परंतु त्या सगळ्या फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांसाठी मध्य रेल्वे प्रशासनाने एलटीटी ते करमाली दरम्यान ६ प्रीमियम एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, कोकणात जाणार्‍या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 


0२0४५ लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाली एसी प्रीमियम एक्स्प्रेस २८ ऑगस्ट, ४ आणि ११ सप्टेंबर रोजी (३ फेर्‍या) बुधवारी मध्यरात्री १ वाजून १0 मिनिटांनी सुटणार असून गुरुवारी सकाळी ११ वाजून ३0 मिनिटांनी करमालीला पोहचणार आहे. तर परतीच्या प्रवासासाठी 0२0४६ करमाली ते लोकमान्य टिळक टर्मिनस एसी प्रीमियम एक्स्प्रेस २८ ऑगस्ट, ४ आणि ११ सप्टेंबर रोजी (३ फेर्‍या) गुरुवारी सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी सुटणार असून लोकमान्य टिळक टर्मिनसला रात्री १0 वाजून १५ मिनिटांनी पोहचणार आहे. या एसी प्रीमियम एक्स्प्रेसला ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी आणि कुडाळ या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे. या एक्स्प्रेसला एसी फस्र्ट क्लासचा एक कोच, एसी टू टायरचे ३ कोच, एसी थ्री टायरचे ८ कोच असणार आहेत.प्रवासी या एक्स्प्रेसचे तिकीट फक्त इंटरनेटद्वारे आरक्षित करू शकतात. आरक्षणाची तारीख रेल्वेद्वारे अजून जाहीर करण्यात आलेली नाही.

Post Bottom Ad