मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये २५८ दिवसांचा पाणीसाठा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 August 2014

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये २५८ दिवसांचा पाणीसाठा

मुंबई / अजेयकुमार जाधव 
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने २ ऑगस्टच्या सकाळी सहा वाजे पर्यंत मुंबईकरांना २५८ दिवस पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. 

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये २ ऑगस्टला सकाळी ९५४६७९ दशलक्ष लिटर इतक्या पाण्याची नोंद झाली असून हा पाणीसाठा मुंबईच्या नागरिकांना २५८ दिवस पुरेल इतका आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी तलाव पूर्ण भरण्यासाठी १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाण्याची गरज असते. तलावांमध्ये दमदार पाऊस पडत असल्याने १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा होण्यासाठी आता फक्त ५ लाख दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. तलाव क्षेत्रात असाच दमदार पाऊस आठवडाभर पडल्यास तलाव भरून वाहू लागण्याची शक्यता आहे. 

तलावांमधील पाण्याची पातळी 
मोडक सागर -    १२८९२५ दशलक्ष लिटर्स
तानसा        -      १२३९७६ दशलक्ष लिटर्स
विहार         -         २०११६ दशलक्ष लिटर्स
तुलसी        -          ८०४६ दशलक्ष लिटर्स
अप्पर वैतरणा-   १२९९१५ दशलक्ष लिटर्स
भातसा         -    ४१५२०० दशलक्ष लिटर्स
मध्य वैतरणा  -  १२८५०१ दशलक्ष लिटर्स
--------------------------------------------------
एकूण    -           ९५४६७९ दशलक्ष लिटर्स

Post Bottom Ad