उपनगरात पालिकेचे नवे वैद्यकीय महाविद्यालय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 August 2014

उपनगरात पालिकेचे नवे वैद्यकीय महाविद्यालय

मुंबई - विलेपार्ले येथे कुपर रुग्णालयाच्या परिसरात पालिकेच्या नव्या वैद्यकीय महाविद्यालयाला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. "मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया‘च्या मंजुरीनंतर पुढील शैक्षणिक वर्षापासून हे महाविद्यालय सुरू करण्याचा प्रयत्न आहे. महाविद्यालयात 150 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. 

कुपर रुग्णालय आणि जोगेश्‍वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयाला जोडून पालिकेने उपनगरात वैद्याकीय महाविद्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला दिला होता. या प्रस्तावाला सरकारने बुधवारी मंजुरी दिली. त्यानंतर पुढील संलग्नित प्रमाणपत्रासाठी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठाचे पथक रुग्णालयातील सोयी-सुविधांचा आढावा घेण्यासाठी रुग्णालयाला भेट देणार आहे. त्यांची परवानगी मिळाल्यानंतर मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडे नोव्हेंबरपर्यंत प्रस्ताव पाठवला जाईल, असे महापौर सुनील प्रभू यांनी सांगितले. 

महानगरपालिकेच्या परळ येथील के. ई. एम, मुंबई सेंट्रल येथील नायर आणि शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात सध्या वैद्यकीय महाविद्यालय सुरू आहे. त्यानंतर सुरू होणारे हे चौथे महाविद्यालय असेल. कुपर रुग्णालयाचा विस्तार सुरू असताना सरकारला महाविद्यालयाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. हे महाविद्यालय सुरू झाल्यास विद्यार्थ्यांना माफक शुल्कात डॉक्‍टर होता येणार आहे.

Post Bottom Ad