भाजपच्या खासदाराची पोलिसाला धक्काबुक्की - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 August 2014

भाजपच्या खासदाराची पोलिसाला धक्काबुक्की

कार्यकर्त्याला पोलिसांच्या ताब्यातून सोड​विण्यासाठी भाजपच्या एका खासदाराने मुलुंडच्या नवघर पोलिस ठाण्यातील एका इन्स्पेक्टरला धक्काबुक्की केल्याचे उघडकीस आले आहे. लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान मुलुंडमधील भाजपच्या एका कार्यकर्त्याविरोधात तक्रार झाली होती. यासंदर्भात चौकशी करण्यासाठी नवघर पोलिस ठाण्यातील इन्स्पेक्टर संपत मुंडे यांनी या कार्यकर्त्याला बोलावले होते. त्यानुसार तो कार्यकर्ता पोलिस ठाण्यात येऊन घडल्या प्रकाराविषयी बोलत असतानाच, तेथे हा खासदार थडकला. यावेळी मुंडे यांनी, असा प्रकार हातून घडणार नाही, असे नमूद असलेला बॉण्ड लिहून घेऊन त्याला सोडून देण्यात येईल, असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर या खासदाराने मुंडे यांना धक्काबुक्की केली.कार्यकर्त्याला पोलिसांच्या ताब्यातून सोडविण्यासाठी पोलिस इन्स्पेक्टरला धक्काबुक्की करण्यापर्यंत मजल गाठलेल्या भाजप खासदारावर राजकीय दबावामुळे केवळ पोलिस डायरीत नोंद झाली आहे. 
लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान झालेल्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी नवघर पोलिस ठाण्यातील इन्स्पेक्टर संपत मुंडे यांनी या कार्यकर्त्याला बोलावले होते. त्याचवेळी पोलिस ठाण्यात धडकलेल्या या खासदाराने त्याला मी माझ्यासोबत घेऊन जाणार आहे, असा आग्रह धरला. यावेळी मुंडे यांनी, असा प्रकार हातून घडणार नाही, असे नमूद असलेला बॉण्ड लिहून घेऊन त्याला सोडून देण्यात येईल, असे सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावर या खासदाराने मुंडे यांच्या अंगावर धावत जाऊन धक्काबुक्की केली. याप्रकरणी पोलिसांच्या कामात अडथळा आणला गेल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकला असता. मात्र, खासदाराच्या दबावामुळे रात्रीपर्यंत पोलिस डायरीतच नोंद करण्यात आल्याचे समजते. मुंडे यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

Post Bottom Ad