डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे नाव घेत गेले कीतेक वर्षे राजकारण करणाऱ्या रामदास आठवले यांची सध्या जबरदस्त जबरदस्त गोची झाली आहे. एकेकाळी प्यान्थर म्हणून ओळखले जाणारे रामदास आठवले यांनी आपली ओळख फुसून टाकायला सुरुवात केली आहे. स्वताची आणि आरपीआयची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्नच केला जात नसल्याने आघाडी आणि महायुतीकडे हात पसरणारा पक्ष अशी आरपीआयची ओळख निर्माण होत आहे.
आठवले यांनी आपल्याला शिर्डी मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने पाडले म्हणून आठवले यांनी आपल्याला शिवसेना भाजपवाले खासदार बनवतील एखादे मंत्रिपद देतील अश्या अपेक्षा ठेवत महायुतीला पाठींबा दिला. महायुती मधून मुंबई महानगर पालिकेची निवडणूक लढवताना आठवलेंच्या आग्रहाखातर महायुतीने आठवले यांना २९ जागा दिल्या. या जागांवर आठवले यांनी पक्षात नवीन आलेले आणि पैसा खर्च करू शकतील अश्या लोकांना तिकिटे विकली. याचा परिणाम होऊन पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाले आणि उभे केलेले उमेदवार पडले. आठवले यांचा एकमेव उमेदवार साब्बा रेड्डी बोरा हे सुद्धा डॉन डी. के. राव यांचा भाऊ असल्याने जिंकून आले आहेत.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये आठवलें यांची राजकीय ताकद ओळखलेल्या महायुतीमधील सेना भाजपाने आठवले यांना साताऱ्याची एकच जागा दिली. या जागेवर उभा केलेला उमेदवार ऐनवेळी आठवलेंना बदलावा लागला. या ठिकाणी दिलेल्या उमेदवाराला इतर पक्षातील लोकांकडून मारहाण झाली होती यामुळे लोकसभा लढवण्यास आपण तयार नसल्याचे या उमेदवाराने सांगून निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. या ठिकाणी आठवलेंनी आपला उमेदवार बदलून निवडणूक लढवण्याचा प्रयत्न केला परंतू नरेंद्र मोदी यांची मिडियाने इतकी हवा करूनही आठवलेंचा सातारा येथील एकमेव उमेदवार पडला. याच निवडणुकीमध्ये शिवसेनेचे बहुतेक सर्वच उमेदवार या मोदी लाटेमध्ये निवडून आले तरी आठवलेंचा एकमात्र उमेदवार या मोदी लाटेमध्ये निवडून आलेला नाही याचा विचार करण्याची गरज आहे.
आठवले यांचे उमेदवार पडण्याची भरपूर करणे आहेत. आंबेडकरी समाजातील बहुतेक नेत्यांनी स्वताचा विचार केला, कधीही राजकारणात लागणारी दुसरी, तिसरी नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची फळी उभी केली नाही, इतर राजकीय पक्षांकडे जागा मागण्यासाठी हात पसरायच्या आधी आपण किती मतदार संघ बांधले आहेत, किती मतदार संघामध्ये आपली ताकद आहे, किती मतदार संघामध्ये आपण प्रबळ दावेदार निर्माण केले आहेत याचा कधीही विचार केलेला नाही. अश्या परिस्थिती मध्ये कोणताही राजकीय पक्ष आरपीआयला हव्या असलेल्या जागा देईल याची शक्यता खूप कमी आहे.
तरीही आठवले यांनी पक्षातील कार्यकर्त्यांना खुश करण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत. विधानसभेसाठी ३५ ते ५० जागा मागणाऱ्या आठवले यांनी आपल्याला इतक्या जागा मिळणार नाही हे आठवले यांना माहित झाल्यावर कमी जागा घेण्याची तयारी केली आहे. २० जागा तरी मिळाव्यात अशी अपेक्षा ठेवणाऱ्या आठवले यांना ५ ते १० जागा मिळताना मुश्कील आहे. तरीही आठवले यांनी १३ ठिकाणी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. ३५ ते ५० जागा मिळाल्या नाही तर वेगळी भूमिका घेवू असे जाहीर करणाऱ्या आठवले यांना जागा मिळणार नाहीत हे कळले असले तरी त्यांना अशी वेगळी भूमिका घेता येणार नाही. काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीला लाथ मारून आलेल्या आठवले यांना सध्यातरी कितीही काहीही झाले तरी सेना भाजपची महायुती सोडता येणार नाही हे सत्य आहे.
महायुतीमधून बाहेर पडल्यास आठवले यांची राजकीय कारकीर्द संपणार आहे. हे आठवले यांना चांगलेच ठाऊक असल्याने आठवले सध्या दोन पाऊले मागे जाऊन कमी जागा घेण्याची तयारी करत आहेत. आठवले यांना विधानसभा निवडणुकीसाठी २ ते ५ जागा दिल्या तरीत्या जागा घेण्याशिवाय आठवले यांच्यापुढे सध्या पर्याय उरलेला नाही. सत्तेमध्ये २० टक्के वाटा मिळेल असे बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या शब्दाखातर आठवले यांनी महायुतीमध्ये आलो असे कित्तेक वेळा सांगितले आहे. ठाकरे यांनी दिलेला शब्द त्यांचे वारस असलेले उद्धव ठाकरे कधी तरी पूर्ण करतील या आशेने आठवले यांना नुसती वाटच बघावी लागणार आहे.
एकीकडे आठवले यांची जी गोची झाली आहे आणि जी फरफट चालू आहे यामुळे शहाणे झालेल्या आंबेडकरी नेत्यांनी लोकसभेसाठी सेना भाजपा काँग्रेस राष्ट्रवादी या प्रस्थापित पक्षांना बाजूला ठेवून एकत्र येण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. आंबेडकरी नेत्यांनी आज खरोखरच असा विचार करण्याची गरज होती तो विचार आज नेते करू लागले आहेत. आंबेडकरी समाजातील नेत्यांनी आपल्यामधील हेवे दावे बाजूला ठेवून खरोकारच एकत्र आल्यास महाराष्ट्र राज्यातील जनतेला चांगला पर्याय मिळू शकतो. याचा विचार सर्वच आंबेडकरी नेत्यांनी करण्याची आज काळाची गरज आहे. आंबेडकरी नेते एकत्र येत असल्यास आंबेडकरी जनतेनेही एकत्र येणाऱ्या नेत्यांना पाठींबा म्हणून आपली मते देवून जिंकवून आणण्याची जबाबदारी पार पडायला हवी.
अजेयकुमार जाधव. (मो. ९९६९१९१३६३)
No comments:
Post a Comment