मुंबई - पुण्याजवळ माळीण गावावर डोंगर कोसळलेला असतानाच मुंबईतही चेंबूरमध्ये दरड कोसळून एका मुलाचा मृत्यू झाला आहे. मुंबईतही तब्बल 327 वस्त्या धोकादायक डोंगरांखाली आहेत. येथील लाखो नागरिक मृत्यूच्या दाढेत पावसाळ्यातील एकेक दिवस जीव मुठीत धरून काढत आहेत. तरीही तीन वर्षांपासून या झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनाचा कृती आराखडा मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही बनवण्यात आलेला नाही.
मुंबईत जागा मिळेल तिथे झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. पूर्वी दगडाच्या खाणी असलेल्या भागात डोंगरउतारावर वस्त्या उभ्या राहिल्या आहेत. मुंबईतील 327 वस्त्यांत 22 हजार 483 झोपड्या असून, एक लाख 15 हजार नागरिक तिथे राहतात. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 19 सप्टेंबर 2011 रोजी बैठक घेऊन दरडीखाली राहणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन करण्यासाठी सर्वेक्षण करून कृती आराखडा तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयांना दिले होते. हे आदेश देऊन 34 महिने उलटले तरी अद्याप आराखडा तयार झालेला नाही. दरडी कोसळून आतापर्यंत मुंबईत 260 नागरिकांचा बळी गेला आहे; मात्र अद्याप कृती आराखडा तयार करण्यात आलेला नाही. नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्याऐवजी मृत्यूनंतर आर्थिक मदत देऊन सरकार स्वस्थ बसत आहे.
दरडीखालील मृत्यू
वर्ष---मृत्यू 1993 - 17
1996 - 17
1997 - 11
2000 - 78
2005 - 73
2009 - 11