‘इबोला’चे संकट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 August 2014

‘इबोला’चे संकट

१९७६ मध्ये एनझारा (सुदान) आणि याम्बुकू (कांगो) येथे पहिल्यांदा या साथीचा प्रादुर्भाव झालेल्या गावातील नदीच्या नावावरून या साथीच्या विषाणूला 'इबोला' नाव देण्यात आले. फिलोव्हिरिडी कुळातील तीनपैकी एक प्रजाती इबोला विषाणू आहे. इबोलाच्या बुंदीबुग्यो इबोला व्हायरस, झायरे इबोला व्हायरस, सुदान इबोला व्हायरस, रेस्टॉन इबोला व्हायरस, ताय फॉरेस्ट इबोला व्हायरस या पाच जाती आहेत. रेस्टॉन इबोला व्हायरस ही जात फिलिपिन्स व चीनमध्ये आढळली होती. वटवाघूळ, माकड आणि डुकरांच्या संपर्कातील व्यक्तींमध्ये या विषाणूचा प्रादुर्भाव होतो. 
इबोला व्हायरस डिसीज (इव्हीडी) याला पूर्वी इबोला हाईमॉरहॅजिक फेव्हर या नावाने ओळखले जात असे. फिलोव्हिरिडी कुळातील तीनपैकी एक प्रजात ही इबोला व्हायरस आहे. इबोलाच्या पाच जाती आहेत.बुंदीबुग्यो इबोला व्हायरस (BDBV), झायरे इबोला व्हायरस (EBOV), सुदान इबोला व्हायरस (SUDV),  रेस्टॉन इबोला व्हायरस (RESTV), ताय फॉरेस्ट इबोला व्हायरस (TAFV) त्यापैकी BDBV, EBOV, SUDV या पहिल्या तीन जाती आफ्रिकेतील प्रादुर्भावासाठी कारणीभूत होत्या. 
RESTV ही जात फिलिपिन्स व चीन प्रजासत्ताक येथे आढळली होती.  हा लक्षणरहित असून, माकडे आणि वराहाच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीमध्ये प्रादुर्भाव होतो. या विषाणूंमुळे आजार किंवा मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे ही जात माणसांसाठी कमी धोकादायक मानली जात असली तरी अधिक अभ्यास गरजेचा आहे. आफ्रिकेतील वटवाघळांच्या Hypsignathus monstrosus, Epomops franqueti and Myonycteris torquata या तीन प्रजाती नैसर्गिक यजमान मानल्या जातात. मात्र १९९४ पासून EBOV आणि TAFV जातींचा उद्रेक चिंपांझी आणि गोरिलांमध्येही आढळला होता.RESTV चा प्रादुर्भाव फिलिपिन्स येथे मॅकाक माकडामध्ये (Macaca fascicularis) आढळला. 
२००८ मध्ये वराहामध्ये RESTV जातीचा प्रादुर्भाव चीन आणि फिलिपिन्समध्ये. इबोला प्रादुर्भावग्रस्त प्राण्यांच्या रक्त, अवयव किंवा शरीरातील स्रावांच्या संपर्कात आलेल्या माणसांमध्ये प्रादुर्भाव होतो. त्यानंतर माणसाकडून माणसांना अशा अवयव, रक्त व स्राव यांच्या माध्यमातून पसरतो. प्रयोगशाळेमध्ये रक्तामध्ये पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेटची संख्या कमी आढळते. जोपर्यंत माणसांच्या रक्त आणि स्रावांमध्ये विषाणू उपलब्ध आहे तोपर्यंत तो माणूस प्रादुर्भावग्रस्त असतो.प्रयोगशाळेमध्ये प्रादुर्भावग्रस्त झालेल्या व्यक्तीच्या वीर्यामध्ये ६१ दिवसांनंतरही विषाणू आढळला होता. तोपर्यंत रोगांचा प्रसार होत राहतो. 

चार दशकांपूर्वी पश्चिम आफिक्रेत इबोलाने थैमान घातले होते. मात्र त्या वेळी पश्चिम आफिक्रेच्या आरोग्य विभागाला इबोलावर नियंत्रण मिळवण्यात यश आले होते. चार दशकांनंतर इबोलाने पुन्हा एकदा पश्चिम आफिक्रेत हाहाकार माजवला असून, या आजारामुळे ९०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र इबोलाचा धोका आता पश्चिम आफिक्रेपर्यंत मर्यादित राहिला नसून, जगभरात इबोलाचा प्रसार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या रोगाची साथ पसरू नये, याकरता जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) इबोलाच्या साथीमुळे जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे.

भारतालाही इबोलाचा धोका असून, मुंबईत इबोलाच्या साथीला अटकाव करण्यासाठी महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. आजारी प्राण्यांच्या माध्यमातून इबोला पसरतो. हा आजार संसर्गजन्य असून इबोलाग्रस्ताशी शारीरिक संबंध ठेवणे, इबोलाग्रस्त रुग्णाने दुस-याला स्पर्श करणे यामुळे हा आजार पसरू शकतो. मृत्यूनंतरही या रोगाची लक्षणे शरीरात असतात. इबोलावर अद्याप प्रभावी औषध उपलब्ध न झाल्याने इबोलामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक असते. या रोगाचा थेट मूत्रपिंड आणि यकृतावर परिणाम होण्याची शक्यता आहे. रक्तपेशी कमी झाल्याने रुग्ण दगावू शकतो. 
या रोगाचा कोणताही उपचार सध्या उपलब्ध नसल्याने अश्या आजार झालेल्यांना मदतीसाठी ओरल रिहाईड्रेशन थैरेपी द्यावी. ज्यामध्ये अश्या रोग झालेल्यांना गोड आणि खारट पाणी देण्यात येते. किंवा सलाईन लावले जाते. या रोगाचा मृत्यूदर मोठ्या प्रमाणात असून हा आजार झालेले ५० ते ९० टक्के रुग्ण मृत्यूमुखी पडण्याची शक्यता आहे.मुंबईत या धोक्याचा सामना करण्यासाठी महापालिकेने कंबर कसली आहे. इबोलाचा रुग्ण आढळल्यास तातडीने उपचार करण्याची तयारी मुंबई महानगर पालिकेने केली आहे. पालिकेच्या रुग्णालयांत याकरता विशेष कक्ष स्थापन करण्यात आले असून, या भयानक रोगाला रोखण्यासाठी आरोग्य विभाग विमानतळ प्राधिकरणाच्याही संपर्कात आहे. इबोलावर प्रभावी औषध उपलब्ध नसल्याने मुंबई महानगर पालिकेचा आरोग्य विभागही हबकून गेला आहे. 
आंतरराष्ट्रीय पातळीवरून अद्याप काही सूचना आलेल्या नाहीत. मात्र इबोलाचा धोका लक्षात घेता आरोग्य विभाग सज्ज करण्यात आले आहे. रुग्णालयात विशेष खाटा उपलब्ध करण्यात येणार आहेत. विमानतळ प्राधिकरणाशी संपर्कात असून, परदेशातून येणा-यांची रक्तचाचणी करण्यासाठी योग्य तयारी झाली आहे. इबोला अद्याप भारतात आलेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना घाबरण्याची गरज नाही. मात्र इबोलाची लक्षणे आढळल्यास रुग्णांनी तातडीने उपचार घ्यावेत. असे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसरकर यांनी आवाहन केले आहे. 
अजेयकुमार जाधव, मो. ९९६९१९१३६३

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad