पुणे : दरड कोसळण्याची भीषण दुर्घटना घडलेले माळीण गाव गुरुवारीही शोकसागरात बुडालेले होते. दुर्घटनेची माहिती मिळताच गावातील लोकांच्या ठिकठिकाणच्या नातेवाईकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. समोर उद्ध्वस्त झालेले गाव, त्यामध्ये गाडली गेलेली रक्ताची, जिव्हाळ्याची माणसं पाहून सर्व नातेवाईक धायमोकलून रडत होती. त्यांचा हा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. येणार्या सर्वांचाच कोणी ना कोणी गेलेला असल्याने धीर कोणी कोणाला द्यायचा हाच प्रश्न येथे निर्माण झाला होता. दरम्यान, या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढून ती आता ३७ झाली असून मातीच्या ढिगार्याखाली १५७ जण दबले गेले असल्याची भीती आहे. बचाव कार्य अद्यापही युद्धपातळीवर सुरू असून ढिगारा उपसण्यास आणखी दोन ते तीन दिवस लागण्याची शक्यता आहे.
Post Top Ad
01 August 2014
Home
Unlabelled
माळीण गावात नातेवाईकांचा आक्रोश
माळीण गावात नातेवाईकांचा आक्रोश
Post Bottom Ad
JPN NEWS
'जेपीएन न्यूज' हे २०१२ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. या न्यूज पोर्टलवर मुंबईसह महाराष्ट्रातील नागरिकांच्या समस्या, ताज्या घडामोडी, राजकारण, मंत्रालय, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बातम्यांना प्रसिद्धी दिली जाते.