आंबेडकर महाविद्यालयाच्या फतव्यामुळे यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी त्रस्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 August 2014

आंबेडकर महाविद्यालयाच्या फतव्यामुळे यशवंतराव मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी त्रस्त

मुंबई / अजेयकुमार जाधव 
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या चेम्बूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील केंद्राने काढलेल्या फतव्यामुळे विद्यार्थ्यांनमधे तीव्र नाराजी पसरली आहे. यामुळे मुक्त विद्यापीठाने या प्रकरणी हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, चेम्बूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे केंद्र चालते. सध्या सर्व केंद्रांवर प्रवेश प्रक्रिया चालू असून अंतिम प्रवेशासाठी २३ ऑगस्ट अशी शेवटची तारीख विद्यापीठाने ठरवून दिली आहे. असे असताना आंबेडकर महाविद्यालयाने एक फतवा काढला असून आम्ही १८ ऑगस्ट नंतर कोणतेही प्रवेश अर्ज स्वीकारणार नाही असे या फतव्यामध्ये म्हटले आहे. 

तसेच या केंद्रावर आधी दिवसभर अर्ज देण्याचे आणि घेण्याचे काम केले जात होते. परंतू ७ ऑगस्ट पासून दुपारी २. ४५ ते ४. ३० या वेळातच अर्ज स्वीकारण्याचे व इतर कार्यालयीन कामकाज केले जाईल असेही या फतव्यात म्हटले आहे. 

यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कामाच्या सुट्ट्या टाकून येथे प्रवेश प्रक्रियेसाठी खेपा मारव्या लागत आहेत. कधी कधी तर केन्द्रावर काम करणारी महिला कर्मचारी येतच नसल्याने विद्यर्थ्यांच्या नुकसान होत आहे. याबाबत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या मुंबई येथील विभागीय कार्यालयशी संपर्क साधला असता २३ ऑगस्ट हिच अर्ज स्वीकरण्याची शेवटची तारीख आहे. यामध्ये कुठलेही बदल केलेले नाहीत. याबाबत अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही संचालक प्रकाश देशमुख यांच्याशी बोला असे सांगण्यात आले. परंतू प्रकाश देशमुख यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता फोन उचलून ते त्यांच्या समोर बसलेल्या लोकांशी बोलत असल्याने संपर्क होऊ शकलेला नाही. 

Post Bottom Ad