पोलिसांनाही आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्याची महापौरांची ग्वाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 August 2014

पोलिसांनाही आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्याची महापौरांची ग्वाही

मुंबई - आपत्ती कोणतीही असो, तेथे सर्वात आधी पोहोचते ते पोलिस दल. तेथील परिस्थिती योग्य रीतीने हाताळण्यासाठी आणि तेथील बचावकार्य गुणवत्तापूर्ण करण्यासाठी पोलिसांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पालिका कटिबद्ध असून लवकरच त्यांना प्रशिक्षण देण्यात येईल, अशी ग्वाही महापौर सुनील प्रभू यांनी दिली. संयुक्त राष्ट्र संघाकडून सन्मान मिळविणाऱ्या पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचा महापौरांनी गौरव केला. 


खार पश्‍चिम परिसरातील लक्ष्मीनारायण सभागृहात "आपत्कालीन व्यवस्थापन प्रथम प्रतिसादक‘ या विषयावर पोलिसांना नुकतेच प्रशिक्षण देण्यात आले. पश्‍चिम प्रादेशिक विभागातील पोलिस ठाण्यांचे अधिकारी व अंमलदार यांच्यासह सहायक पोलीस आयुक्त शिवाजीराव कोळेकर व सुरेश वेदक उपस्थित होते. कोणत्याही आपत्तीप्रसंगी पोलिस दल हे प्रथम प्रतिसादक आहे. प्रत्येक आपत्तीमध्ये पोलिस दलाचा प्रतिसाद अत्यंत महत्त्वाचा असतो. ही बाब लक्षात घेता पोलिसांना आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण देणे आवश्‍यक आहे. त्यामुळे आणीबाणीच्या प्रसंगी पोलिस दलाचा प्रतिसाद अधिक गुणवत्तापूर्ण व तातडीचा असायला हवा. त्यामुळे संभाव्य जीवित व वित्तहानी कमी होण्यास मदत होईल, असे महापौर म्हणाले. 

Post Bottom Ad