मुंबईमधील आगीत ३ वर्षात ६८० लोकांचा मृत्यू - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 August 2014

मुंबईमधील आगीत ३ वर्षात ६८० लोकांचा मृत्यू



२१४० लोक तर ६३ कर्मचारी जखमी
मृत कर्मचाऱ्यांची माहिती देण्यास नकार
मुंबई / अजेयकुमार जाधव / http://jpnnnews.webs.com
भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई मध्ये सन २०१० ते २०१३ या ३ वर्षात विविध ठिकाणी लागलेल्या आगी मध्ये ६८० लोकांचा मृत्यू झाला असून २१४० लोक जखमी झाले आहेत. या तीन वर्षात आग विझवताना अग्निशमन दलाचे तब्बल ६३ कर्मचारी जखमी झाले असल्याची माहिती अधिकारातून अग्निशमन दलाने दिली आहे. मात्र अग्निशमन दलाचे किती अधिकारी कर्मचारी मृत्युमुखी पडले याची माहिती अग्निशमन दलाने दिलेली नाही. 

माहिती अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांनी दिलेल्या माहिती अधिकारातून सन २०१०-११ मध्ये १३२२ लोक जखमी झाले असून २० अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले आहेत तर २५८ लोकांचा मृत्यू झाला आहे, सन २०११-१२ मध्ये ३४२ लोक जखमी झाले असून २४ अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले आहेत तर १८९ लोकांचा मृत्यू झाला आहे. सन २०१२-१३ मध्ये ४७६ लोक जखमी झाले असून १९ अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले आहेत तर २३३ लोकांचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे. 

अग्निशमन दलाला सन २०१०- ११ मध्ये १६२५५, सन २०११-१२ मध्ये १५६६६ तर सन २०१२-१३ मध्ये १७२४९ असे तीन वर्षात एकूण ४९१७० कॉल आले. यामध्ये आगीचे १४०४९, घरे पडल्याचे ९४०, सुरक्षित बाहेर काढण्यासाठी १९७९९, तर इतर १४३२८ कॉल होते अशी माहिती जनमाहिती अधिकारी (शहर) तथा विभागीय अग्निशमन अधिकारी यांनी दिली आहे.  

सन २०१० ते २०१३ या तीन वर्षात किती अग्निशमन दलाचे कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला याची माहिती अग्निशमन दलाने दिलेली नाही. मृत कर्मचाऱ्यांची माहिती हवी असल्यास अग्निशमन दलाच्या कार्यालयातील अभिलेखाची तपासणी करावी असे सांगून मृत कर्मचाऱ्यांची संख्या माहिती अधिकारातून सांगण्यास नकार देवून माहिती अधिकाऱ्याने पळवाट काढत मृत कर्मचाऱ्यांची माहिती लपवण्याचा प्रयत्न केला आहे. 

Post Bottom Ad