आपत्कालीन व्यावास्तापन विभागाची माहिती
मुंबई / अजेयकुमार जाधव / http://jpnnews.webs.com
मुंबईमध्ये विषारी वायुंचा फैलाव झाल्यास, अणूंचा किरणोत्सर्ग झाल्यास किंवा मुंबईवर अणुहल्ला
झाल्यास त्याचा मुकाबला करण्यासाठी लागणारी कोणतीही यंत्रणा मुंबईमध्ये कार्यरत नाही तसेच त्यासाठी लागणारी सामुग्रीसुद्धा मुंबईमध्ये उपलब्ध नाही अशी माहिती मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने माहिती अधिकार कार्यकर्ते शरद यादव यांना दिली आहे.
मुंबईमध्ये विषारी वायुंचा किवा अणूंचा किरणोत्सर्ग झाल्यास त्या अनुषंगाने कारवाही करायची झाल्यास कोणती आणि काय कारवाही केली जाते याची विस्तृत अशी माहिती द्यावी अशी मागणी शरद यादव यांनी पालिकेच्या आपतकालीन विभागाकडे केली होती. यावर महाराष्ट्र शासनाने सुनिश्चित अशी कार्यपद्धती केली असून ती पुस्तक रुपात आपत्कालीन विभागकडे उपलब्ध आहे. हि कार्यपद्धती गोपनीय असून ती पालिकेच्या नायर, सायन, आणि केईएम या रुग्णालयाच्या डीन कडे पाठवण्यात आली आहे.
मुंबई मध्ये विषारी वायुंचा किवा अणूंचा किरणोत्सर्ग झाल्यास पुण्याच्या तळेगाव येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाच्या तुकड्यांना रासायनिक जैविक आण्विक आणि किरणोत्सर्ग आपत्ती बाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक असणारी सामुग्री सुद्धा त्यांच्याकडे ठेवण्यात आली आहे. या तुकड्यांना मुंबईमध्ये दीर्घ मुदतीकरिता वास्तव्यासाठी ठेवण्यात येणार असून त्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची कारवाही सुरु आहे.