तलाव क्षेत्रात २ दिवसात ८१ दिवसांचा पाणीसाठा वाढला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 August 2014

तलाव क्षेत्रात २ दिवसात ८१ दिवसांचा पाणीसाठा वाढला

मुंबई  : मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये गेल्या दोन दिवसांनपासून पडलेल्या मुसळधार पाऊसामुळे ८१ दिवसांचा पाणीसाठा जमा झाला आहे . मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांत २९ जुलैला ४९९६६९ दशलक्ष लिटर्स इतका पाणीसाठा होता.  हा पाणीसाठा मुंबईला १३५ दिवस पुरेल इतका होता. ३१ जुलैला सकाळी सहा वाजेपर्यंत ८०३२३१ दशलक्ष लिटर्स इतका पाणीसाठा जमा झाला आहे . हा पाणीसाठा मुंबईला २१७ दिवस पुरेल इतका आहे . तलावांमध्ये दोन दिवसात ८१ दिवसांचा पाणीसाठा जमा झाला आहे . 
मुंबईला १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर्स पाण्याची वर्षभरात गरज असते . या वर्षी एक महिना उशिरा पाऊस सुरु झाला असला तरी ८ लाख दशलक्ष लिटर्स इतका पाणीसाठा जमा झाला असल्याने आता ६ लाख ३६ हजार दशलक्ष लिटर्स इतक्या पाण्याची गरज आहे. तलाव क्षेत्रात असाच मुसळधार पाऊस ऑगस्ट च्या पहिल्या आठवड्यात पडल्यास पाणी पुरवठा करणारी सर्वच तलाव भरून वाहू लागली अशी शक्यत वर्तवली जात आहे . 

मोडक सागर -  १२८९२५
तानसा        -    ९८९६० 
विहार         -      १६७५८ 
तुलसी        -        ८०४६
अप्पर वैतरणा-    १०५६४९
भातसा         -    ३३९३४५
मध्य वैतरणा  -    १०५५४८
-------------------------------------------------------
एकूण    -         ८०३२३१ दशलक्ष लिटर्स  

Post Bottom Ad