मुंबई ( प्रतिनिधी ) : मुंबईच्या चेंबूर माहूल गावातील अशोक नगर, वाशी नाका येथील डोंगराचा २० बाय २० फुटाची दरड कोसळून खाली असलेल्या घरांच्या पत्र्यान वर कोसळली . या दुर्घटनेत एक मुलगा अडकला होता. त्याला बाहेर काढून उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले होते . परंतु वैद्यकीय अधिकार्याने या मुलाला मृत घोषित केले . या मुलाचे नाव गणेश कुमार कुराडे असून तो सहा वर्षाचा आहे.
मुंबईमध्ये २००८ पासून २०१३ पर्यंत अद्याप दरड कोसळण्याच्या शहरामध्ये १४, पूर्व उपनगरात ३८ , पश्चिम उपनगरात १५ घटना घडल्या असून गेल्या सहा वर्षात २५ जण जखमी झाले आहेत तर १८ जणाचा मृत्यू झाला आहे .
दरम्यान पुणे येथील मालीन मध्ये दरड कोसळल्याने मुंबई मधील दरड कोसळू शकतील अशा २६३ ठिकाणे असून या मध्ये १ लाख ७० हजार लोक राहत आहेत. या लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने डोंगराळ भागात दरडी कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी संवरक्षक भिंती बांधाव्यात त्यासाठी आपत्कालीन व्यवस्था म्हणून तातडीच्या निधीची तरतूद करावी. तसेच पुढील वर्षाच्या अर्थ संकल्पात संवरक्षक भिंती बांधण्यासाठी भरगोस निधीची तरतूद करावी अशी मागणी पालिकेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी पालिका आयुक्तान कडे केली आहे.