कामगारांसाठी मासिक वेतन मर्यादा 15 हजारांपर्यत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 August 2014

कामगारांसाठी मासिक वेतन मर्यादा 15 हजारांपर्यत

PF LOGO
नवी दिल्ली  : संघटीत क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱयांना, कामगारांना केंद्रीय मंत्रिमंडळाने दिलासा दिला आहे. मासिक वेतनाची मर्यादा 10 हजारांवरून 15 हजार रूपये करतानाच निवृत्त कर्मचाऱयाला मासिक पेन्शन किमान 1 हजार रूपये देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली आहे. आता याबाबतचे आदेश देण्यात आले असून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता सप्टेंबरपासून होणार आहे. 

संघटीत, असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी विविध योजना आहेत, कर्मचारी पेन्शन योजना 1995 अर्थात ईपीएस 95 ची योजना जाहीर झाली, पण त्याची अंमलबजावणी होत होती. काँग्रेस सरकारने सत्तेवरून पायउतार होण्यापुर्वी 28 फेब्रुवारीला मासिक वेतनाची मर्यादा वाढवण्याचा आणि किमान 1 हजार रूपये पेन्शन देण्याचा निर्णय घेतला होता, पण आचारसंहितेमुळे, निवडणुकांच्या तोंडावर त्याची अंमलबजावणी मात्र काँग्रेस आघाडी सरकारने केली नव्हती.
दरम्यान, केंद्रात भाजप आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर केंद्रीय भविष्यनिर्वाह निधी संघटनेच्या या प्रलंबित निर्णयाच्या हालचालीला वेग आला होता. केंद्र सरकारने मासिक पेन्शन कमीत कमी 1 हजार रूपये देणे आणि मासिक वेतन मर्यादा 10 हजार रूपयांपासून 15 हजार रूपये करण्याच्या निर्णयाची अधिसुचना गुरूवारी जारी केली आहे सामाजिक सुरक्षेच्यादृष्टीने महत्वपूर्ण असलेले हे दोन्ही निर्णय 1 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. यातील इपीएस 95 योजनेंतर्गत मासिक पेन्शन किमान 1 हजार रूपयांच्या निर्णयाचा लाभ 28 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.
भविष्यनिर्वाह निधीचा लाभ मिळण्यासाठी किमान मासिक वेतनाची मर्यादा 6 हजार 500 रूपये होती, ती आता 15 हजार रूपयांपर्यत करण्यात आली आहे. या निर्णयामुळे 50 लाख कर्मचाऱयांना याचा लाभ होणार आहे, अशी माहिती केंद्रीय भविष्यनिर्वाह निधी विभागाचे आयुक्त के. के. जालान यांनी गुरूवारी दिली.
ते म्हणाले, सरकारने मासिक वेतन 15 हजार रूपये केल्याने आता कर्मचाऱयांना सेवानिवृत्तीनंतर महिन्याला किमान 1 हजार रूपये पेन्शन मिळणार आहे. तसेच कौटुबिक पेन्शनचा लाभ 3 लाख रूपयांपर्यत मिळण्याच्यादृष्टीने पाऊल उचलले आहे. ईडीएलडी योजनेंतर्गत विम्याच्या स्वरूपात 3 लाख 60 हजार रूपये मिळणार असून त्यानंतर 60 हजार रूपयांचा अतिरिक्त लाभ कर्मचाऱयांना होणार आहे, याबाबतची अधिसुचनाही लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱयाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला सध्या मिळणारी रक्कम 1 लाख 56 हजार आहे ती आता 3 लाख 60 हजार रूपये होणार आहे.
केंद्रीय भविष्य निर्वाह निधीच्या या आदेशांमुळे सध्या 1 हजार रूपयांपेक्षा कमी पेन्शन मिळणाऱयांना 1 ऑक्टोबरपासून 1 हजार रूपये पेन्शनपोटी मिळणार आहेत. या निर्णयाचा लाभ 28 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. त्यात 5 लाख विधवा आहेत. भविष्यनिर्वाह निधीच्या केंद्रीय न्यास बोर्डाच्या 5 फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत ईपीएस 95 योजनेत दुरूस्तीचा निर्णय घेण्यात आला होता, त्यानुसार पेन्शन वाढ आणि किमान वेतनवाढीचा लाभ आता कर्मचाऱयांना मिळणार आहे.

Post Bottom Ad