लोटस बिझनेस पार्कमध्ये लागलेल्या आगीत नितीन इवलेकर या अग्निशमन जवानाचा मृत्यू पालिकेच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे. या मृत्यूला पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आयुक्त सीताराम कुंटे हे जबाबदार असून त्यांच्याविरुद्ध खूनखटला दाखल करणार असल्याची माहिती कामगार नेते शरद राव यांनी दिली.
लोटस पार्कला ओसी मिळवून देणारे तत्कालीन मुख्य अग्निशमन दल अधिकारीझंडवाल व इतर अधिकारी, स्थायी समितीचे अध्यक्ष शैलेश फणसे, स्थापत्य समितीचे अध्यक्ष अनिल शमशेरसिंग आदींविरोधातही खटला दाखल करण्याचा निर्णय मुंबई फायर सर्व्हिसेस युनियनतर्फे घेण्यात आला आहे. इवलेकर यांच्या कुटुंबीयांना दिलेली १५ लाखांची आर्थिक मदत तुटपुंजी असून ५० लाख रुपये मदतीची मागणी युनियनने केली आहे.