मुंबई - मुंबई महानगर पालिकेतील घनकचरा व्यवस्थापन खात्यात सुरु असलेल्या अनागोंदी कारभारावर आज स्थायी समितीत सर्व पक्षीय सदस्यांकडून आक्षेप घेण्यात आला. या प्रकरणी संबंधित खात्याचे उपयुक्त प्रकाश पाटील यांची चौकशी करावी अशी मागणी सर्व पक्षीय सदस्यांनी केली.
घनकचरा खात्याअंतर्गत विचारलेल्या प्रश्नांना प्रशासनाकडून वेळेत उत्तर मिळत नसल्याचे सांगत सदस्यांनी या विषयाला वाचा फोडली. स्थायी समिती सदस्याच्या प्रश्नांनाही प्रशासनाकडून थातूर मातुर उत्तरे देऊन बोलावण केली जात असल्याचा आरोप अनेक सदस्यांनी केला. दत्ताक्वस्ती योजनेतील अनागोंदी कारभार देवनार क्षेपण भूमीतील भ्रष्टाचार, कचरा उचलणाऱ्या कान्त्रात्दाराच्या कारभारावर कानाडोळा अश्या प्रकरणात डोळेझाक केली जात आहे. असा आक्षेप आज स्थायी समिती सदस्यांनी घेतला .
दरम्यान यावेळी गटनेत्यांना पालिकेकडून देण्यात येणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या गाड्यान संदर्भातील प्रश्न उपस्थित केले गेले. सभागृह नेत्या तृष्णा विश्वास राव यांनी आपल्या दिलेल्या गाडीवर आतापर्यंत दुरुस्तीसाठी २३ लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले. तर पालिकेच्या गाड्या दुरुस्तीसाठी स्वतःची गरेज असताना खाजगीरीत्या या गाड्या बाहेरून का दुरुस्त करून घेतल्या जातात , असा सवाल सदस्यांनी केला. यावर पालिका अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी एका आठवड्यात आपण स्वतः सर्व सदस्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊ असेही स्पष्ट केले.