खोट्या प्रतिज्ञापत्रा आधारे म्हाडाची फसवणूक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 July 2014

खोट्या प्रतिज्ञापत्रा आधारे म्हाडाची फसवणूक

मुंबई / अजेयकुमार जाधव 
म्हाडाच्या नियमाप्रमाणे अर्जदार ज्या शहरातील घरासाठी अर्ज करत आहे त्या शहराच्या हद्दीत त्याचे किवा त्याच्या पत्नी व मुलांच्या नावावर निवासी भूखंड किंवा घर नसले पाहिजे मात्र घरांसाठी अर्ज करताना अनेकजण असे असतात की त्यांच्या नावे त्याच शहरात दुसरे घर असते. खोट्या माहितीच्या आधारे म्हाडाची फसवणूक करून घर मिळवल्याचा असाच एक गैरप्रकार माहिती अधिकाराच्या अंतर्गत सामाजिक कार्यकर्ते पृथ्वी मस्के यांनी उघडकीस आणला आहे. 
शाहजहान अब्दुल माजिद हवालदार याने दोन हजार दहा साली वर्सोवा येथील म्हाडाच्या उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज केला होता. सदर अर्जामध्ये त्याने सध्या रहात असलेली मरोळ येथील गुलमोहर अपार्टमेंट येथील सदनिका मोहम्मद हुसेन यांच्या मालकीची असून आपण येथे भाडे तत्वावर वास्तव्यास असल्याचा खोटा तपशील दिला. वास्तविकतः मरोळ येथील सदनिका हुसेन अब्दुल मजीद हवालदार व शाहजहान हवालदार यांनी संयुक्तरीत्या किशनलाल व राजेंद्रकुमार रतनप्रकाश बाफना यांच्याकडून दोनहजार एक साली खरेदी केली. त्याचप्रमाणे शाहजहान याच्या नावावर जरीमरी येथे विमानपत्तन प्राधिकरणाच्या जमिनीवर एक झोपडेही होते. दोन हजार दोन साली प्राधिकरणाने शिवशाही प्रकल्पाअंतर्गत जमिनीवर बाधित असलेल्या झोपडीच्या बदल्यात शाहजहानच्या नावे दिंडोशी येथील इमारतीमध्ये विनामूल्य सदनिका वितरीत केली.  

म्हाडाच्या नियमानुसार मुंबई महानगरपालिका हद्दीत स्वतः च्या, पत्नीच्या वा मुलाच्या नावे भूखंड अथवा सदनिका असल्यास ती व्यक्ती सोडत प्रक्रियेत भाग घेण्यास अपात्र ठरते. मात्र मुंबईमध्ये शाहजहान याच्या नावे दोन दोन घरे असताना त्याने आपले मुंबईत एकही घर नसल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र म्हाडास सादर केले व म्हाडाची फसवणूक केली. पृथ्वीराज मस्के यांनी म्हाडाच्या दक्षता अधिकाऱ्यांची भेट घेऊन शाहजहान याचे वर्सोवा येथील घर सील करावे व त्याच्या विरोधात म्हाडाची फसवणूक केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. मुंबईत घरे असूनही म्हाडाची घरे फसवणूक करून लाटलेली अनेक लोक आहेत, अशा लोकांचा आपण शोध घेणार असून म्हाडाला कारवाई करण्यास भाग पडणार असल्याचे मस्के यांनी सांगितले. मुंबईत मालकीचे घर नसावे हा नियम तरी म्हाडाने रद्द करावा अथवा म्हाडाने यापुढे सोडत व सदनिका वितरण प्रक्रियेत असलेल्या त्रुटी नष्ट करून कडक उपाययोजना करावी जेणेकरून गरजूंना घरे मिळतील व फसवेगिरीला आळा बसेल, अशी मागणी मस्के यांनी केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS