मुंबईच्या अग्निशमन दलासाठी काम करून आपल्या जीवाची पर्वा न करता मुंबईकर नागरिकांना आगी पासून वाचवण्याचे काम करणाऱ्या जवानांनचा विमा काढला जात नसल्याने या जवानांचा विमा काढण्यात यावा, अशी मागणी मुंबई महानगर पालिकेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र आंबेरकर यांनी केली आहे.
अंधेरी येथील लोटस पार्क येथे लागलेल्या आगीमध्ये आग विझवताना नितीन इवलेकर या जवानाचा मृत्यू झाला होता. तसेच २१ जवान आगीत होरपळून जखमी झाले होते. इवलेकर यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या कुटुंबियांना १५ लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले असतानाच मुंबईकरांना आगी मधून वाचवण्याचे काम करणाऱ्या अग्निशमन दलातील जवानांना विमा संरक्षण नसल्याचे उघड झाले झाले आहे.
अग्निशमन दलामध्ये काम करणारे जवान आपल्या जिवावर उदार होऊन मुंबई करांचे प्राण वाचवत असतात. त्यामुळे पालिकेने व अग्निशमन दलाने अग्निशमन दलात काम करणाऱ्या २५०० हून अधिक कर्मचाऱ्यांना विम्याचे संरक्षण द्यावे अशी मागणी आंबेरकर यांनी केली आहे.