एअरलाईन क्षेत्रात मराठी मुला/ मुलींचा टक्का वाढावा, त्यांच्यापर्यंत योग्य व अचूक माहिती पोहचावी, अनुसूचित जाती/ जमातीच्या व दारिद्र्यरेषेखालच्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करियर करण्याची संधी प्राप्त करून देणे, महाराष्ट्र शासनाची विविध महामंडळे यांच्याकडून अनुसूचित जाती/ जमातीच्या विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य मिळवून देणे, सदर प्रशिक्षणासाठी समाज कल्याण विभागाकडून देण्यात येणा-या शिष्यवृत्ती रकमेत व संख्येत वाढ करावी. तसेच शासनाचे या क्षेत्राविषयी असलेले उदासीन धोरण या बाबींवर प्रकाशझोत टाकण्यासाठी दि स्कायलाईन एविएशन क्लब या संस्थेने मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार परिषद आयोजित केली होती.
अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणा-या या क्षेत्राकडे मराठी विद्यार्थ्यांचा ओघ वाढावा, एअरलाईन क्षेत्रात मराठी टक्का वाढावा, तळागाळातल्या सामान्य मराठी माणसांपर्यंत या क्षेत्राविषयी योग्य व अचूक माहिती पोहचावी, तसेच उत्पन्नाची मर्यादा व टक्केवारी संबंधी अटी शिथिल करणे, शासनाकडून कमी व्याजदरावर खुल्या प्रवर्गातील प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देणे, दारिद्रय रेषेखालील विद्यार्थ्यांना या क्षेत्रात प्रशिक्षण घेत यावे यासाठी विविध एनजीओच्या माध्यमातून आर्थिक सहकार्याची तरतूद करणे, केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत संख्येत वाढ घडवून आणणे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कायमस्वरूपी हेलीपेड तयार करणे, इतर राज्यांच्या तुलनेत एविएशन क्षेत्रात महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास घडवून आणणे या व अशा अनेक योजनांची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास संस्थेच्या ०२२-२८९८३५१६ / ६५७०५२४४ या क्रमांकावर संपर्क साधता येइल असे आवाहन कॅप्टन ए. डी. मनेक यांनी केले आहे.