धारावीतील बेघर कुटुंबांचे पुनर्वसन करा - वर्षा गायकवाड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 July 2014

धारावीतील बेघर कुटुंबांचे पुनर्वसन करा - वर्षा गायकवाड

प्रेमनगर येथे २00१ मध्ये महापालिकेने अवैध बांधकामे पाडली होती. या कारवाईत १९९५ पासून वास्तव्याचे पुरावे असलेल्या ७४ झोपड्यांवरदेखील त्या वेळी कारवाई करण्यात आली. या कुटुंबीयांनी महिला व बाल कल्याण मंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची दखल घेत वर्षा गायकवाड यांनी संबंधित अधिकार्‍यांना या कुटुंबीयांचे पुनर्वसन करण्याची सूचना केली आहे. 
१९९५चे पुरावे असूनदेखील आमच्या झोपड्यांवर कारवाई केली. हा एक प्रकारे आमच्यावर झालेला अन्याय आहे. आमचे अजूनही पुनर्वसन करण्यात आलेले नाही. १३ वर्षे उलटून गेली तरी आमच्या निवार्‍याची अद्यापि सोय केली गेली नाही. आमची कुणीही दखल घेतली नाही. शासनाने २000 पर्यंतच्या झोपड्यांना अधिकृत मान्यता दिली आहे. या परिस्थितीत आमचेही पुनर्वसन करा, अशी मागणी करण्यासाठी अन्यायग्रस्त झोपडीधारकांनी महिला व बाल कल्याण मंत्री वर्षा गायकवाड यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.या वेळी उपस्थित असलेल्या अधिकार्‍यांना आमदार वर्षा गायकवाड यांनी याबाबत विचारणा करून प्रेमनगर येथील मनपाच्या तोडक कारवाईचे शिकार झालेल्या ७४ झोपडपट्टीवासीयांकडे पुरावे असतानाही त्यांच्यावर कोणत्या नियमांतर्गत कारवाई केली त्याचप्रमाणे बेघर झालेल्या त्या ७४ कुटुंबांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करा, अशी सूचना केली.

Post Bottom Ad

JPN NEWS