नव्या फेरीवाल्यांनाही मिळणार परवाने - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 July 2014

नव्या फेरीवाल्यांनाही मिळणार परवाने

फेरीवाला धोरणानुसार मुंबईत अडीच लाखांहून अधिक फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणे बंधनकारक असताना आतापर्यंत केवळ एक लाख 30 हजार अर्जांचेच वितरण झाले आहे. त्यामुळे नव्या फेरीवाल्यांनाही परवाने मिळण्याची वाट मोकळी झाली आहे. 

महापालिकेद्वारे होत असलेल्या फेरीवाल्यांच्या सर्वेक्षणाचा सोमवारी शेवटच्या दिवशी आणखी पाच ते सहा हजार अर्जांची भर पडण्याची शक्‍यता महापालिकेचे अधिकारी वर्तवत आहेत. शहराच्या लोकसंख्येच्या अडीच टक्के फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे होते. त्यानुसार मुंबईत अडीच ते तीन लाख फेरीवाल्यांचे पुनर्वसन करणे महापालिकेला बंधनकारक होते; मात्र अद्यापपर्यंत निम्म्याहून कमी फेरीवालेच समोर आले आहेत. त्यामुळे जुन्या फेरीवाल्यांचे पुनर्वसन पूर्ण झाल्यानंतर जागा उरल्यास महापालिकेच्या कारवाईचे पुरावे दाखवणाऱ्या नव्या फेरीवाल्यांना परवाने देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांनी सांगितले. सोमवारी सर्वेक्षण संपल्यानंतर 30 जुलैपासून अर्ज स्वीकृती सुरू होणार आहे. या अर्जांसोबत फेरीवाल्यांना त्यांचे निवासाचे पुरावे आणि पोलिस किंवा पालिकेने केलेल्या कारवाईच्या पावत्या सादर कराव्या लागणार आहेत. 

Post Bottom Ad

JPN NEWS