मुंबईतील फेरीवाल्यांचे परवाने फक्त मुंबईतीलच भूमिपुत्रांना, महिला बचत गटांना आणि कोळ्यांना देण्याची मागणी सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी केली आणि राज्याबाहेरील परप्रांतीयांना फेरीवाला परवाना देण्यासही विरोध केला. मात्र त्यांना समाजवादी पक्षाचे नगरसेवक रईस शेख यांनी विरोध करताना परप्रांतीय फेरीवाल्यांची बाजू उचलून धरली आणि फेरीवाला सर्वेक्षणाची मुदत वाढवून देण्याची मागणी केली. या चर्चेच्या वेळी भाजपाच्या बिना दोषी यांनी 'बाहेरून किती लोकांना आणणार, असा सवाल केल्यामुळे रईस शेख व त्यांच्यात चांगलाच वाद झाला. बिना दोषी यांनाही त्यांनी 'तुम्ही गुजरातवरून आला आहात, असे ऐकवले. त्या वेळी भाजपाचे गटनेते मनोज कोटक, दिलीप पटेल व अन्य सदस्य आक्रमक झाले होते. 'रईस शेख यांनी गुजराती समाजाचा व महिला नगरसेविकेचा अवमान केल्याचा आरोप केला. या वेळी कोटक यांनी शेख यांना उद्देशून तुम्ही दुबईहून आलात का, असे विचारले. भाजपाच्या नगरसेवकांनीही रईस शेख हाय हाय, रईस शेख माफी मागा, महिलांचा अपमान खपवून घेणार नाही, अशा घोषणा देत गदारोळ घातला.
मात्र महापौरांनी गटनेत्यांची बैठक घेऊन रईस शेख आणि भाजपाच्या सदस्यांनी आपापले शब्द मागे घेण्याची सूचना केली. त्यानंतरही सभागृहात रईस शेख यांनी शब्द मागे न घेता आणि माफी न मागता, 'मी कोणत्याही समाजाबद्दल वक्तव्य केलेले नसून कोणीही दुखावेल असे बोललो नसल्याचे सांगितले आणि हा विषय पुढे सुरू ठेवण्याची मागणी केली. त्या वेळी भाजपाच्या सदस्यांनी शेख यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरूच ठेवत गदारोळ घातला.
मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी पालिकेचा फेरीवाला सर्व्हे चुकीचा आहे. मागासवर्गीय, अपंग, अल्पसंख्याकांना आणि महिलांना या धोरणात आरक्षण देणार का, असा प्रश्न केला. फेरीवाला सर्वेक्षणात गौडबंगाल करणार्या उपायुक्त आनंद वाघराळकर यांना निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली. मुंबईला बकाल आणि विद्रुप करण्याचे काम महापालिका करत आहे आणि सर्वेक्षणात भ्रष्टाचार होत आहे. सत्ताधारी पक्षाचा पालिकेवर अंकुश नाही, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केली. सदस्यांच्या चर्चेला उत्तर देण्यासाठी अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी निवेदन सुरू केल्यावर महापौरांनी त्यांना बसवत गदारोळातच काम आटोपते घेत सभा तहकूब केली.