अंधेरीतील आगीची अतिरिक्त मनपा आयुक्तामार्फत चौकशी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 July 2014

अंधेरीतील आगीची अतिरिक्त मनपा आयुक्तामार्फत चौकशी

मुंबई - अंधेरीतील लोटस बिझनेस पार्क या 22 मजली इमारतीला शुक्रवारी लागलेल्या आगीची बृहन्मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तामार्फत सखोल चौकशी केली जाईल, असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मोहम्मद आरिफ (नसीम) खान यांनी जाहीर केले. 
खान यांनी शनिवारी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. तसेच कूपर रुग्णालयात जखमींची विचारपूस केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर चन्ने, सहायक पोलिस आयुक्त धनेदर, अग्निशमन विभागाचे अधिकारी जाधव, उपविभागीय अधिकारी झरे, मनपाचे सहायक आयुक्त शंकरवाड यांच्यासह संबंधित विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

नसीम खान यांनी संबंधित अधिकारी, स्थानिक नागरिक, व्यावसायिक, तसेच सोसायटी पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून घटनेची माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी या अपघाताची महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तामार्फत उच्चस्तरीय सखोल चौकशी केली जाईल, असे जाहीर केले. चौकशीनंतर दोषींवर कारवाई करू, असेही ते म्हणाले. अपघातासंदर्भात स्थानिक पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करून घटनेची चौकशी करण्यात यावी, असे निर्देश त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिले.

Post Bottom Ad