मुंबई - मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावामध्ये गेल्या काही दिवसापासून समाधान कारक पाऊस पडत असल्याने मुंबई मधील पाणीकपात २० टक्यांनवरून १० टक्के कमी करण्यात येत असल्याची घोषणा आज अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी यांनी स्थायी स्थायी समिती मध्ये केली. त्यामुळे आता मुंबईत फ़क़्त १० टक्के पाणीकपात सुरु राहणार आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये समाधानकारक पाऊस पडत नसल्याने मुंबईमध्ये २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली होती. परंतु गेले काही दिवस समाधानकारक पाऊस पडत असल्याने तलावान मध्ये पाण्याचा साठा वाढू लागला आहे. ३०जुलै रोजी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सकाळी ६ वाजता ६ लाख ८६ हजार २४१ दशलक्ष लिटर पाण्याची नोंद झाली आहे. यामुळे तलावांमध्ये १८५ दिवस पुरेल इतका पाणीसाठा जमा झाला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तुळसी तलाव २८ जुलैला भरून वाहू लागल्या नंतर आज सकाळी ४ वाजून ०५ मिनिटांनी मोडक सागर तलाव भरून वाहू लागला.
तलावांची पातळी / दशलक्ष लिटर्स मध्ये (३० जुलै २०१४ )
मोडक सागर - १२८९२५
तानसा - ८५१८७
विहार - १५२६८
तुळसी - ८०४६
अप्पर वैतरणा - ८०९७३
भातसा - २८५५०१
मध्य वैतरणा - ८२३४२
------------------------------ -----------------------------
एकूण - ६८६२४१ दशलक्ष लिटर मध्ये