अंधेरीतील आगीचे कारण गुलदस्त्यातच - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 July 2014

अंधेरीतील आगीचे कारण गुलदस्त्यातच

मुंबई - अंधेरी येथील लोटस बिझनेस पार्कला लागलेल्या आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यातच असून अग्निशमन दलाने सुरू केलेल्या तपासाचा अहवाल सोमवारी (ता.29) प्रशासनाला सादर होण्याची शक्‍यता आहे. आग लागलेल्या 22 व्या मजल्यावर पेंट्री आढळून आली असल्याचे समजते. 

रविवारपासून या आगीचा तपास सुरू करण्यात आला; मात्र एक आठवडा झाला, तरी आगीचे निश्‍चित कारण स्पष्ट झालेले नाही. इमारतीतील अग्निप्रतिबंधक यंत्रणा कुचकामी असल्याचे आगीच्या वेळीच उघड झाले होते. तसेच अग्निशमन दल आणि पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाने केलेल्या तपासणीत इमारतीत मोठ्या प्रमाणात अंतर्गत बदल करण्यात आल्याचे आढळून आले. त्यातच आता ज्या 22 व्या मजल्यावर आग लागली तिथे पेंट्री आढळून आली आहे. यात गॅसजोडणी नसली, तरी मायक्रोव्हेवसारख्या इलेक्‍ट्रॉनिक उपकरणातून शॉर्ट सर्किट होऊन आगीची ठिणगी पडली का, याचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, या आगीत नितीन इवलेकर या अग्निशमन दलातील जवानाचा मृत्यू झाल्याने तसेच यामुळे शहरातील सर्वच बहुमजली इमारतींमधील आगप्रतिबंधक उपाययोजनांचा प्रश्‍न ऐरणीवर आल्यामुळे अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र चौकशी करण्यात येत आहे. इमारतीतील अग्निप्रतिबंधक यंत्रणा, अग्निप्रतिबंधक यंत्रणेचे ऑडिट झाले होते का नाही, झाले असल्यास त्यांना दिलेल्या शिफारशींची अंमलबजावणी झाली होती का, या बाबींचा या चौकशीत समावेश आहे. याअंतर्गत सध्या जबाब नोंदवण्यात येत असून, सात-आठ दिवसांत हा अहवाल तयार होईल, असे अडताणी यांनी सांगितले. 

Post Bottom Ad

JPN NEWS