वातावरणात बदल झाले कि लोकांना आजारांना सामोरे जावे लागते. मुंबईमध्ये विशेष करून पावसाळा सुरु झाला की मुंबईकर विविध आजारांनी त्रस्त होतात. दर वर्षी मुंबई महानगर पालिका मुंबई मधील आजारांची आकडेवारी प्रसिद्ध करत असते. या वर्षी पालिकेने जुलै महिन्याच्या २० तारखे पर्यंतची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या आकडेवारी वरून आरोग्य विभागाने आपली पाठ थोपटवून घेण्याचा प्रकार केला आहे.
मुंबई मध्ये सन २०१३ मध्ये जून मध्ये पावसाची सुरुवात झाली होती. त्यावेळी पालिकेकडे तापाच्या ३७१३, मलेरियाच्या ८५८, लेप्टोच्या २१, डेंग्यूच्या ३२, एच १एन१ च्या २, ग्यास्ट्रोच्या १२९७, टायफाईडच्या ७९, हेपेटायसीसच्या ७३, चिकनगुनियाच्या ८, कॉलराच्या १२ रुग्णांची नोंद झाली होती.
जुलै २०१३ मध्ये पाऊस जसा वाढत गेला तशी आजारी लोकांच्या संखेमध्ये झपाट्याने वाढ झाली होती. त्यावेळी तापाच्या ६२६४, मलेरियाच्या १२६२, लेप्टोच्या २४, डेंग्यूच्या ६६, एच १एन१ च्या २, ग्यास्ट्रोच्या २६०४, टायफाईडच्या १५२, हेपेटायसीसच्या १५२, चिकनगुनियाच्या ६, कॉलराच्या ४४ रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या वर्षाची आकडेवारी पाहिल्यास जून महिन्या पेक्षा रुग्णांची संख्या दुप्पट वाढली असल्याचे दिसत आहे.
सन २०१४ चा विचार करता मुंबईमध्ये पावसाळा एक महिना उशिरा सुरु झाला आहे. जुलैच्या सुरुवातीलाच पाऊस पडण्यास सुरुवात झाली आहे. जून मध्ये पाऊस पडलाच नसल्याने आजारी लोकांची नगण्य असणार आहे. पण पाऊस जुलै महिन्यात सुरु झाल्याने जुलै महिन्यात आजारी पडू लागल्याने लोकांनी रुग्णालयात धाव घेतली आहे.
जुलै २०१४ च्या पहिल्याच आठवडय़ात तापाचे १,२७८, गॅस्ट्रोचे ३५४ आणि मलेरियाचे १०३ रुग्ण आढळले आहेत. लहानांपासून ते अगदी मोठय़ांपर्यंत सर्वच जण तापाने फणफणले असून अनेकांनी खासगी व सरकारी रुग्णालयांकडे त्यांचा मोर्चा वळवला आहे. पावसाच्या हजेरीने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने अचानक बदल झाला आहे.
अवघ्या आठवडय़ाभरातच तापाचे १,२७८ रुग्ण आढळले आहेत. मलेरियाचे १०३ रुग्ण आढळले असून पाणीपुरवठा करणा-या अनेक जलवाहिन्यांना ठिकठिकाणी पडलेली छिद्रे आणि दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोसारखे आजारही बळावले आहेत.जुलैच्या पहिल्या आठवडय़ात गॅस्ट्रोचे ३५४ रुग्ण आढळले आहेत.तर जानेवारी ते जून या काळात मुंबईत जूनमध्ये २७ तर जुलैमध्ये डेंग्यूच्या ७ रुग्णांची नोंद झाली आहे.
२० तारखेपर्यंत तीन आठवड्यामध्ये तापाच्या ३९५०, मलेरियाच्या ४५०, लेप्टोच्या ४, डेंग्यूच्या २३, ग्यास्ट्रोच्या ११४१, टायफाईडच्या ७०, हेपेटायसीसच्या ११०, कॉलराच्या २ रुग्णांची नोंद झाली होती. तर एच १एन१ च्या व चिकनगुनियाच्या एकाही रुग्णाची नोंद पालिकेच्या रुग्णालयात झालेली नसल्याचे आकडेवारी मध्ये म्हटले आहे.
जुलैच्या पहिल्या तीन आठवड्यामध्ये पालिकेची आकडेवारी पाहिल्यास ताप, मलेरिया, डेंग्यू, ग्यास्ट्रो, टायफाईड, हेपेटायसीस या आजारांच्या रुग्णांची नोंद पाऊस कमी पडत असतानाही मोठ्या प्रमाणात झाली आहे. तरीही आकडेवारी प्रसिद्ध केल्यावर पालिकेच्या आरोग्य विभागाने आपली पाठ थोपटून घेण्याचे काम केले आहे. मुंबईमध्ये पाऊस कमी पडल्याने रुग्णाची संख्या गेल्या वर्षीपेक्षा कमी झाली आहे याकडे आरोग्य विभागाचे बहुतेक लक्ष गेले नसल्याचे दिसत आहे.
मुंबई मध्ये हवा तसा पाऊस पडला नसल्याने मुंबईमध्ये रोगराई पसरलेली नाही, यासाठी पावसाला धन्यवाद देणे गरजेचे आहे. परंतू मुंबईमध्ये मागील वर्षापेक्षा रुग्णांची संख्या कमी झाली म्हणून आरोग्य विभागाने हुरळून जाता कामा नये. पाऊस उशिरा सुरु झाला असला तरी अजून पाऊसाचे दोन महिने बाकी आहे. पालिकेने म्हणावी पाऊले उचलेली दिसत नाही. यामुळे रुग्णाची संख्या वाढण्याच्या आधीच मुंबईकर नागरिकांचे स्वास्थ्य चांगले राहावे यासाठी पालिकेने व आरोग्य विभागाने तयारीत राहण्याची गरज आहे.
अजेयकुमार जाधव
मो. ९९६९१९१३६३
No comments:
Post a Comment