ट्रेस पासिंग ठरतेय डोकेदुखी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 July 2014

ट्रेस पासिंग ठरतेय डोकेदुखी

उपनगरी रेल्वे रूळ ओलांडताना मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रवाशांनी दोन मिनिटांचा वेळ वाचवण्यासाठी स्वत:चा जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडू नयेत, पादचारी पुलाचा वापर करावा, असे कि तीही बजावून सांगितले तरी प्रवासी मात्र त्याकडे काणाडोळा करताना दिसत आहेत. त्यामुळे ट्रेस पासिंग ही रेल्वेची डोकेदुखी ठरत आहे.
रेल्वे रूळ ओलांडताना मृत्युमुखी पडणार्‍या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) ने पाच संवेदनशील रेल्वे स्थानकांत रुग्णवाहिका तैनात केली आहे. या रुग्णवाहिकेमध्ये अत्यावश्यक उपकरणे आणि प्रशिक्षित पथक नेमण्यात आले आहेत. ट्रॅकवरील अपघातांविषयी जागतिक बँकेच्या साहाय्याने १२0 कोटी रुपयांचा विशेष प्रकल्प राबवण्यात आला आहे. त्यातूनच ही रुग्णवाहिका रेल्वे स्थानकांवर ठेवण्यात आली आहे. उपनगरी लोकल मार्गावर रेल्वे रूळ ओलांडताना दिवसाला सरासरी ८ ते ९ जण नाहक बळी पडतात. या समस्येविषयी जागतिक बँकेने चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर एमआरव्हीसीतर्फे सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यानंतर जागतिक बँकेच्या साहाय्याने १२0 कोटी रुपयांची योजना आखण्यात आली होती. त्यात बोरिवली, कांदिवली, कुर्ला, कांजुरमार्ग, वडाळा या पाच संवेदनशील रेल्वे स्थानकांची निवड करण्यात आली. त्या ठिकाणी रुग्णवाहिका कायमस्वरूपी ठेवण्यात आली आहे. यासाठी महिन्याला ५0 हजार रुपये खर्च आहे; परंतु रेल्वे प्रशासनाने एवढा खर्च करून काहीही उपयोग होत नाही.

Post Bottom Ad