फेरीवाला क्षेत्रात महिला बचत गटांना दहा टक्के जागा आरक्षित ठेवा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 July 2014

फेरीवाला क्षेत्रात महिला बचत गटांना दहा टक्के जागा आरक्षित ठेवा

मुंबई - फेरीवाल्यांनी नोंदणी करण्यासाठी महापालिकेने फेरीवाल्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी महापालिका तीन क्षेत्रे (झोन) तयार करणार असून या नवीन फेरीवाला क्षेत्रात महिला बचत गट, महिला सामाजिक संस्था आणि महिला विक्री संघांना दहा टक्के जागा आरक्षित ठेवण्याची मागणी सुधार समितीत करण्यात आली आहे. 
नगरसेविका मनीषा चौधरी यांनी ही मागणी केली असून त्यांच्या मागणीचे पत्र बुधवारी होणार्‍या सुधार समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे. महिलांचे सक्षमीकरण आणि बळकटीकरण करण्यासाठी स्वयंरोजगार आणि महिला बचत गट योजना गतिमान करण्यासाठी महापालिका प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे या महिला बचत गट आणि महिला संघांना सातत्याने संधी देणे गरजेचे आहे. सध्या महापालिकेचे नवीन फेरीवाला धोरण अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे या महिला बचत गट आणि महिला संघांना नवीन फेरीवाला क्षेत्रात दहा टक्के जागा आरक्षित ठेवण्यात यावी अशी मागणी चौधरी यांनी केली आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS