पालिकेच्या शाळांमध्ये मुलामुलींना मिळणार कराटेचे प्रशिक्षण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 July 2014

पालिकेच्या शाळांमध्ये मुलामुलींना मिळणार कराटेचे प्रशिक्षण

शालेय अभ्यासक्रमात कराटेचा समावेश करणार
मुंबई - महापालिकेच्या शाळांतील मुलींबरोबरच यापुढे मुलांनाही कराटेचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. कराटे सारख्या स्वरक्षणार्थ खेळांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्यात येणार आहे. शाळेत शारीरिक शिक्षणाच्या तासालाच हे वर्ग घेण्याचा प्रशासनाचा विचार आहे. 
सर्वसामान्य घरातील मुलींना आपले स्वसंरक्षण करता यावे यासाठी २०१३-१४ या शैक्षणिक वर्षापासून महानगरपालिकेच्या शाळेतील मुलींना कराटेचे प्रशिक्षण दिले जाते. महापालिकेच्या शाळेत येणार्‍या बालकांना अनेकदा समाजातील अपप्रवृत्तींना सामोरे जावे लागते. त्यामुळे महानगरपालिकेच्या शाळेतील मुलांनाही कराटेचे प्रशिक्षण दिले जावे, अशी मागणी नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. या मागणीवर प्रशासनाने होकारार्थी अभिप्राय दिला आहे. 

या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता ७ वी ते ९ वीच्या विद्यार्थिनींना ज्युडो कराटेचे प्रशिक्षण दिले जात आहे. २०१ केंद्रांमध्ये सध्या ३० हजार ८९२ मुली प्रशिक्षण घेत आहेत. पहिली दोन वर्षे फक्त मुलींनाच हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मात्र, त्यानंतरच शालेय अभ्यासक्रमात समावेश केला जाणार आहे. त्यामुळे ही योजना प्रत्यक्षात येण्यास दोन वर्षे लागणार आहेत. 
 

Post Bottom Ad

JPN NEWS