कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचा निर्णय तांत्रिक समितीच्या सल्ल्यानंतरच - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 July 2014

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचा निर्णय तांत्रिक समितीच्या सल्ल्यानंतरच

बईला पाणीपुरवठा करणार्‍या महत्त्वाच्या जलाशयांमध्ये अजूनही समाधानकारक पाऊस पडत नसल्यामुळे पालिकेच्या जल अभियंता विभागातील वरिष्ठ चिंतातूर झाले आहेत. जुलै संपत आला तरीही जलाशयांमध्ये कमी पाऊस पडत असल्याने कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याची तयारी पालिकेने सुरू केली असून, त्याची चाचपणी करणे, यासंदर्भात मत देणे आदींसाठी काही तज्ज्ञांची समिती नियुक्त केली आहे. त्यात आयआयटी, आयएमडी आणि पुणे येथील आयआयटीएम या नामांकित संस्थांमधील तज्ज्ञांचा समावेश आहे. या समितीच्या सल्ल्यानंतरच कृत्रिम पाऊस पाडायचा की नाही, याचा अंतिम निर्णय महापालिका येत्या १५ दिवसांत घेणार आहे.

कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी महापालिकेने या क्षेत्रातील कंपन्यांकडून निविदा मागवल्या होत्या. त्याला भारतातील 'माय अवनी'आणि 'व्यापी' या कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. या कंपन्यांनी सादर केलेल्या निविदा महापालिकेच्या निविदा समितीने उघडल्या आहेत. त्यांच्या तांत्रिक तपशिलांचा अभ्यास पालिकेने नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने केला असून आर्थिक निविदांचा अभ्यास या समितीने सुरू केला आहे. आर्थिक निविदा पालिके च्या निकषांची पूर्तता करणार्‍या आहेत का, याचा अभ्यास ही समिती करत आहे. ज्या कंपनीला कृत्रिम पाऊस पाडण्याचे कार्यादेश मिळतील, त्या आधी ही समिती सर्वांगाने निविदा तपासत असून, त्यात कोणत्याही त्रुटी राहता कामा नयेत, याची काळजी ही समिती घेत आहे, अशी माहिती महापालिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. 

Post Bottom Ad

JPN NEWS