मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबईमध्ये या वर्षी जुलै महिना संपायला आला तरी समाधानकारक पाऊस पडला नसल्याने मुंबई मधील साथीच्या आजारांच्या रुग्णांच्याही संखेत गेल्या वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारी वरून रुग्णांची संख्या कमी झाल्याचे म्हटले आहे.

मुंबई मध्ये पावसाळ्यात साथीचे आजार डोके वर काढतात, पण या वर्षी मात्र हे समाधानकारक पाऊस पडला नसल्याने हे चित्र घटल्याचे दिसत आहे. जून व जुलै २0१३ मध्ये साथीच्या रुग्णांची संख्या १६ हजार ६७१ एवढी होती त्या तुलनेत जून व जुलै २0१४ मध्ये साथीच्या आजाराच्या रुग्णांची संख्या १२ हजार ८0 एवढी आहे. यामुळे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा रुग्णांच्या संख्येत चार हजार ५९१ ने घट झाली आहे, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे. खाजगी रुग्णालयांतील रुग्णांची संख्या पालिकेकडे उपलब्ध नसल्याने त्यांचा समावेश या आकडेवारीमध्ये केलेला नाही असे पालिकेने म्हटले आहे. पाऊस जोरात पडल्यास या संखेमध्ये वाढ होऊ शकते.
साथीच्या रुग्णांची संख्या :
जुन आणि जुलै २0१३ जुन आणि जुलै २0१४
ताप- ९९९७ ८५९२
मलेरिया- २१२0 १0१६
लेप्टो- ४५ ६
डेंग्यू- ९८ ५0
स्वाईन फ्ल्यू- ४ ०
गॅस्ट्रो- ३९0१ २0५१
टायफॉईड- २३१ १५0
कावीळ- २२५ २0६
चिकुनगुनिया- १४ ५
कॉलरा- ५६ ३