एटीव्हीएमच्या मदतनीसांअभावी रेल्वेला आर्थिक फटका - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 July 2014

एटीव्हीएमच्या मदतनीसांअभावी रेल्वेला आर्थिक फटका

टीव्हीएम यंत्राद्वारे तिकीट देण्यासाठी असलेल्या मदतनीसांना (फॅसिलेटर) रेल्वे बोर्डाच्या आदेशानुसार हटवल्यानंतर मध्य रेल्ेवच्या एटीव्हीएमवरून विकल्या जाणार्‍या तिकिटांमध्ये प्रचंड घट झाली आहे. जवळपास निम्म्यापेक्षा जास्त प्रवाशांनी एटीव्हीएमकडे पाठ फिरवली असून तिकीट खिडक्यांवरील रांगा वाढल्या आहेत. एटीव्हीएममधून मिळणार्‍या उत्पन्नात तब्बल ६ कोटींची तूट पडली आहे. परिणामी, रेल्वेला वार्षिक ७२ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
तिकीट खिडक्यांवरील रांगा कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने एटीव्हीएमवर तिकीट देण्यासाठी फॅसिलेटरची नियुक्ती केली होती. मात्र रेल्वे बोर्डाच्या आदेशामुळे हे फॅसिलेटर काढून टाकण्यात आले. एटीव्हीएम यंत्राच्या स्मार्टकार्डचा अभाव आणि हाताळण्यास किचकट यामुळे प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरवली. रेल्वे मार्गावर ७0४ फॅसिलेटर कार्यरत होते. मात्र जून महिन्यात रेल्वे बोर्डाने दिलेल्या आदेशानुसार त्यांना काढून टाकण्यात आले. त्यामुळे ७0४ पैकी ६0६ फॅसिलेटर कमी झाले. परिणामी, लोकांना एटीव्हीएमद्वारे तिकीट काढणे अशक्य होऊ लागले. त्यामुळे प्रवाशांनी तिकीट खिडक्यांवर रांगा करण्यास सुरुवात केली, तर अनेकांनी विना तिकीट प्रवास करण्यास सुरुवात केली. त्यामुळे रेल्वेचा एटीव्हीएमद्वारे मिळणारा महसूल बुडाला.

Post Bottom Ad