एमआयएम-दलित पक्षांच्या आघाडीची शक्‍यता? - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 July 2014

एमआयएम-दलित पक्षांच्या आघाडीची शक्‍यता?

मुंबई - एमआयएम (मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी नुकतीच यूथ रिपब्लिकन पक्षाचे नेते आणि नगरसेवक मनोज संसारे यांची भेट घेतली. ओवेसी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दलित पक्षांसोबत आघाडी करण्याची शक्‍यता वर्तवल्याने या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. दलित आणि मुस्लिम समाजांना एकत्र आणल्यास मोठी राजकीय शक्ती निर्माण होऊ शकते, असा विश्‍वास ओवेसी यांनी "सकाळ‘शी बोलताना व्यक्त केला. रमजान ईदनंतर राज्यातील दलित नेत्यांसोबत राजकीय चर्चेबाबत पुढील हालचाली होतील, अशी माहिती त्यांनी दिली. एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांसोबत आपले वैयक्तिक संबंध आहेत, त्यामुळे ओवेसींची सदिच्छा भेट घेतल्याचे संसारे म्हणाले. दलित आणि मुस्लिमांना एकत्र आणण्याचा राज्यात सर्वप्रथम प्रयोग प्रा. जोगेंद्र कवाडे आणि हाजी मस्तान यांनी केला होता. 

Post Bottom Ad

JPN NEWS