टीएमटी होणार बेस्ट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 July 2014

टीएमटी होणार बेस्ट

मुंबई : ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेला (टीएमटी) बेस्ट उपक्रमामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी बेस्टचे महाव्यवस्थापक ओमप्रकाश गुप्ता हे उत्सुक आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत टीएमटी बेस्टमध्ये विलीन होणार असली तरी ठाणे महानगरपालिकेला पहिल्या वर्षी टीएमटीचा सुमारे २५ कोटी रुपयांचा वार्षिक तोटा बेस्टला भरून द्यावा लागणार आहे.
टीएमटीला मुंबईच्या बेस्टमध्ये समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी ठाण्यातील जनतेसह राजकीय नेत्यांनीदेखील केली आहे. टीएमटीकडे ३५0 बसेस असून त्या ठाणेकरांसाठी कमी आहेत. त्यामुळे ठाणे शहराच्या प्रत्येक भागात बस पोहोचत नाही. बेस्टच्या बसेस ठाणे शहरापर्यंत धावतात. पण त्यांची हद्द तीन हात नाका व कॅडबरी जंक्शनपर्यंतच आहे. तसेच मुलुंड ते मीरा रोड व मुलुंड ते बोरिवली या मार्गावर व्हाया घोडबंदर रोड मार्गे बेस्टची सेवा दिली जाते. टीएमटीला बेस्टमध्ये समाविष्ट करून घेतल्यास बेस्ट संपूर्ण ठाण्यामध्ये आपली सेवा देऊ शकते. त्याचा फायदा ठाण्यातील प्रवाशांसोबतच बेस्टलाही होऊ शकतो, असे मत बेस्टमधील वरिष्ठ अधिकारी मांडतात. 

बेस्टच्या परिवहन विभागाचा सध्या ७00 कोटी रु पयांचा तोटा आहे. ही तूट ठाणे शहरात बेस्टची सेवा सुरू झाल्यास भरून काढता येऊ शकते. दक्षिण मुंबईतून ठाणे येथे जाणार्‍या प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात आहे. त्यामुळे सीएसटी व्हाया फ्रीवे मार्गे घाटकोपर पूर्व द्रुतगतीमार्गे ठाणे स्टेशन अशी बससेवा सुरू करणे शक्य होणार आहे. बेस्टकडे सध्या ४ हजार २00 बसगाड्या आहेत. टीएमटीची सेवा बेस्टमध्ये समाविष्ट करून घेण्यास काहीच हरकत नसली तरी पहिल्या वर्षी ठाणे महानगरपालिकेला टीएमटीची तूट भरून काढावी लागणार आहे. 

Post Bottom Ad