मुंबईत तापाच्या रुग्णांत वाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 July 2014

मुंबईत तापाच्या रुग्णांत वाढ

जुलै महिन्यात पालिकेकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, मुंबईत तापाच्या रुग्णांत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. १३ जुलैपर्यंत जवळपास ६ हजार २६४ तापाच्या रुग्णांवर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. तापानंतर गॅस्ट्रो, मलेरियाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 
यंदा जून महिन्यात दडी मारल्यानंतर पावसाने जुलै महिन्यात दमदार हजेरी लावली. गेल्या चार दिवसांपासून पावसाने दांडी मारल्याने वातावरणातील उष्मा वाढला आहे. त्यामुळे रोगराई पसरण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. १३ जुलै रोजी तापाच्या रुग्णांची संख्या ३ हजार ७१३ होती, मात्र दोन दिवसानंतर ही आकडेवारी ६ हजार २६४ पर्यंत पोहचली आहे. गॅस्ट्रोचे २ हजार ६0५, मलेरियाचे १ हजार २६२, टायफाईड आणि हेपिटायटिसचे १५२, डेंग्यूचे ६६, कॉलराचे ४४, लेप्टो २४, चिकनगुनियाचे ६ आणि एन१एन१च्या २ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. 

मार्च २0१४ पर्यंत ३२५ रुग्णांचा क्षयरोगाने मृत्यू झाला. वर्ष २00८ मध्ये ११५४ व्यक्तींचा क्षयरोगाने मृत्यू झाला, तर २00९ मध्ये १२७४, २0१0 मध्ये ११८५, २0११ मध्ये १२४६, २0१२ मध्ये १३८९ व्यक्तींचा क्षयरोगामुळे मृत्यू झाला होता. वर्ष २0१३ मध्ये हीच आकडेवारी १३९३ इतकी होती. मागील ६ वर्षांत म्हणजे वर्ष २00८ ते २0१३ या कालावधीत ७६४१ क्षय रुग्णांचा मृत्यू झाला होता, तर एप्रिल २0१३ ते मार्च २0१४ या आर्थिक वर्षात १२९९ इतक्या क्षय रुग्णांचा मृत्यू झाल्याचे उपलब्ध नोंदींवरून समजते.

Post Bottom Ad