मुंबई - मुंबईतील विविध सेवांचे भूमिगत जाळे आपत्कालीन स्थितीत अत्यंत अडचणीचे ठरते. भूमिगत वाहिन्या आणि मॅनहोलमुळे अग्निशमन दलासमोर आपत्कालीन स्थितीत अडचणींचा डोंगर उभा राहतो. अग्निशमन दलाच्या ताफ्यात आता "लोडमन‘ हे अत्याधुनिक उपकरण दाखल होणार असल्यामुळे या अडचणी दूर होणार आहेत.
वीज, टीव्ही आणि दूरध्वनीच्या केबल तसेच गॅस पाईपलाईन यांचे भूमिगत जाळे मुंबईत पसरले आहे. या वाहिन्या टाकल्यानंतर अथवा डागडुजी केल्यानंतर खणून ठेवलेले रस्ते कामचलाऊ पद्धतीने बुजवले जातात. माती आणि खडी टाकून चर बुजवले तरी रस्त्याखाली पोकळी राहते. अशा ठिकाणी अग्निशमन दलास वजनदार उंच शिड्या वापरता येत नाहीत. अंधेरीतील लोटस बिझनेस पार्क आगीच्या वेळी अशाच अडचणींचा सामना अग्निशमन जवानांना 68 मीटरची शिडी वापरताना करावा लागला. शिडी उभी करण्यात जागोजागी असणारे मॅनहोल अडथळे ठरत होते.
नियमानुसार मॅनहोलपासून दीड मीटर अंतराच्या आत शिडीचा "जॅक‘ ठेवता येत नाही. मोठ्या शिड्यांसाठी "जॅक‘ हे पायासारखे काम करतात. कमकुवत जमिनीवर "जॅक‘ ठेवण्यात अडचणी येतात. आता मात्र ही अडचण दूर होणार आहे. अग्निशमन दल "लोडमॅन‘ हे उपकरण खरेदी करणार आहे. त्यामुळे "जॅक‘च्या जारही बाजूंना शिडीच्या वजनाचा किती टक्के भार पडतो, याचा अंदाज बांधता येईल. त्यानुसार मदतकार्यासाठी शिडी वापरणे सुलभ होईल. संगणकीय जाळ्याच्या "कॅनबास‘ या प्रणालीतून शिडीची क्षमता समजते.