मुंबई- सुगंधी दुधावरून वारंवार आरोप होऊ लागल्यामुळे महापालिकेने विद्यार्थ्यांना चिकी देण्याचा निर्णय घेतला आहे. दुधामुळे तोंड पोळलेली पालिका चिकीबाबत कोणताही वाद ओढवून घेऊ इच्छित नाही. त्यामुळेच चिकीला चकाचक वेष्टण देण्याची अटच प्रशासनाने घातली आहे, पंरतु आधीच एवढ्या मोठ्या प्रमाणात चिकी पुरवण्यासाठी कंत्राटदार मिळत नसून, चकाचक वेष्टणाच्या अटीमुळे ही चिकी लांबण्याची शक्यता आहे.
2007 पासून पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुगंधी दूध देण्यात येत होते; मात्र काहींना हे दूध न पचल्याने सर्व नगरसेवकांनी ते बंद करून चिकी देण्याची मागणी केली. त्यानुसार आता या विद्यार्थ्यांना चिकी देण्यात येणार आहे, पंरतु भविष्यात चिकीतूनही बाधा होऊन वाद होण्याची भीती प्रशासनाला वाटत आहे किंवा दुसऱ्याच चिकीच्या नावाने पालिकेवर आरोप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिकेतर्फे पुरवण्यात येणाऱ्या चिकीला कॅडबरीप्रमाणे चकाचक वेष्टण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, पालिकेच्या सुमारे साडेचार लाख विद्यार्थ्यांना चिकीपुरवठा करण्यासाठी कंत्राटदारच मिळत नव्हता. त्यामुळे निविदा काढून तीन कंत्राटदार नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र चकाचक वेष्टणाची नवी अट मान्य करण्यास कंत्राटदार तयार न झाल्यास हे चिकीवाटप अजून लांबणार आहे.