महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात हेपटायटीस रोगाचे प्रमाण वाढत आहे. या रोगाबद्दल जागरुकता मिर्माण करने ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन डॉ. राजू कनाकिया यानी केले.जागतिक हेपटायटीस दिनाचे औचित साधून हेफ फ्री इण्डिया या संस्थेच्या वतीने दादर कनाकिया हेल्थ केअर नीलकंठ निवास येथील सभागृहात हेपटायटीस तपासणी व मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
" लिवर " " यकृत " हा आपल्या शरीरातील अति महत्वाचा अवयव आहे. तो पाचशे कार्य करतो आणि अन्न आणि रोग् यांच्याशी संघर्ष करून आपले शरीर निरोगी ठेवण्याचा पर्यंत करतो. बारा व्यक्ती पैकी एका व्यक्तीला हेपटायटीस झालेला असतो. तसेच या रोगामुळे प्रत्येक ३० तें ४० सेंकदाला एका व्यक्तीचा मृत्यू होतो. या रोगामुळे दरवर्षी १० लाख लोक मरण पावतात यावर लवकर निदान केल्यास आजार टाळता येतो असे कनाकिया म्हणाले.
मुंबई तसेच महारष्ट्रातील १६ जिल्ह्यातील ३५ केंद्रात, तसेच चेक नाका या ठिकाणी ऑन लाईन माहितीपूर्ण संवाद आणि इ - मेल, व्हाट अप, एस. एम. एस., पोस्टर, प्रत्रक तसेच स्थानिक डॉक्टर याच्या मार्फत जनजागृती करण्यात आली या शिबिरात ७५००० लोकांनी हेपटायटीस बी, सी ची तपासणी करून घेतली. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी रिलायन्स फ्रेश, सहकरी भंडार, इंडिअन ओइल कॉर्पोरेशन, एमएस आरडीसी, वेलनेस फोरेवर, लिवर क्लिनिक आणि मेडी विजन इंफोमिडीया यांचे मोलाचे सहकार्य लाभले.