अपंगांच्या डब्यातून प्रवास करणार्‍या सुदृढ प्रवाशांच्या संख्येत वाढ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 July 2014

अपंगांच्या डब्यातून प्रवास करणार्‍या सुदृढ प्रवाशांच्या संख्येत वाढ

अपंग प्रवाशांना सोयीस्कररीत्या प्रवास करता यावा म्हणून रेल्वेत अपंगांसाठी राखीव डब्याची सोय करण्यात आली आहे. मात्र अपंग प्रवाशांपेक्षा सुदृढ प्रवासीच या राखीव डब्याचा लाभ घेत असल्याचे दिसून येत आहे. ठाणे स्थानकातही अपंगांच्या डब्यातून प्रवास करणार्‍या ५१ सुदृढ प्रवाशांवर रेल्वे सुरक्षा दलाने १५ जुलै ते १९ जुलै या कालावधीत कारवाईचा बडगा उचलला असल्याचे आरपीएफने सांगितले. रेल्वे सुरक्षा बलाने ५१ लोकांवर कारवाई केली आहे. विशेष बाब म्हणजे यात पुरुषांची संख्या जास्त असून बड्या बड्या कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेल्या उच्च शिक्षित लोकांची संख्या जास्त असल्याचीही माहिती समोर आली आहे. अपंगांच्या डब्यात अपंग नसलेले प्रवासी सापडल्यास १२७५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आव्हान करण्यात आले. 

Post Bottom Ad