राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 July 2014

राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना



महाराष्ट्रात सातत्याने पूर, भूकंप, चक्रीवादळ तसेच पाणीटंचाई अशा नैसर्गिक आपत्ती येतात. प्रत्येक वर्षी राज्यातील १५ ते २0 जिल्ह्यांना पूर आणि अतवृष्टीचा तडाखा बसतो. विदर्भातील काही जिल्हे आणि मराठवाड्याचा काही भाग त्याचप्रमाणे कोयना, रायगड, सातारा, ठाणे हा भाग दुष्काळप्रवण आणि भूकंपप्रवण क्षेत्रात मोडतो. लातूरमध्ये झालेल्या भूकंपामुळे अपरिमित नुकसान झाले होते. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी विदर्भातील जिल्ह्यामध्ये पुराचा तडाखा बसला त्या वेळी नागरिकांना हलवण्यासाठी पुणे येथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची मदत घेण्यात आली होती. सध्या ही तुकडी पुणे, तळेगाव दाभाडे येथे असल्याने त्यांना आपत्तीस्थळी पोहचायला खूप वेळ लागतो. ही पार्श्‍वभूमी लक्षात घेऊन दोन स्वतंत्र तुकड्या निर्माण करण्यात येतील. प्रत्येक कंपनीत एकूण तीन टीम्स असून प्रत्येकात ४५ अधिकारी व कर्मचारी असतील.

Post Bottom Ad

JPN NEWS