वाहतूक कोंडीवर उपाय ठरलेल्या पूर्व मुक्त मार्गावर आता सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. या मार्गावर १२ ठिकाणी कॅमेरे बसवण्यात येणार असून याद्वारे वाहनांचा वेग आणि क्रमांक नोंदवता येऊ शकतो. वरळीतील वाहतूक पोलीस मुख्यालयातून या सीसीटीव्हीवर नजर ठेवण्यात येणार आहे.
पी.डी. डिमेलो मार्गावरील एस.व्ही.पटेल जंक्शन ते घाटकोपर येथील पांजरपोळ हा १४ किमीचा मार्ग सिग्नलविरहित आहे.त्यामुळे वाहनचालकांनी पहिल्या दिवसापासून या मार्गाला पसंती दिली आहे.मात्र वेगाने वाहने चालवल्यामुळे दिवसेंदिवस या मार्गावर होणार्या अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबई वाहतूक पोलीस आणि मुंबई मनपाच्या वाहतूक विभागाने संयुक्तरीत्या केलेल्या पाहणीनंतर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. सीसीटीव्ही बसवण्यासाठी ६0 लाख रुपये खर्च येणार आहे. केरळमधील 'एआरएस ट्राफिक अँण्ड ट्रान्सपोर्ट टेक्नॉलॉजी' या कंपनीचे कॅमेरे मार्गावर नजर ठेवणार आहेत. आणिक ते पांजरपोळ पट्टय़ातील रहिवासी या मार्गाचा वापर करतात. या रहिवाशांच्या सुरक्षेसाठी मार्गाच्या दोन्ही बाजूला साडेसहा फूट उंचीची संरक्षक भिंत उभारल्याची माहिती एमएमआरडीएच्या माहिती प्राधिकरणाचे सहप्रकल्प संचालक (जनसंपर्क) दिलीप कवठकर यांनी दिली.