मुंबईत लवकरच उपलब्ध होणार फिरती शौचालये - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 July 2014

मुंबईत लवकरच उपलब्ध होणार फिरती शौचालये

मुंबई :  मुंबईत शौचालयांची खूप अपूरी व्यवस्था आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत शौचालयांच्या सुविधेत वाढ करण्याची मागणी सातत्याने विविध पक्षाचे नगरसेवक करीत आहे. मात्र मुंबईत शौचालये बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने शौचालयांची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. ही उणीव भरून काढण्यासाठी झोपडपट्ट्या तसेच अत्यंत निकडीच्या ठिकाणी फिरती शौचालयांची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेनेचे नगरसेवक बाळा नर यांनी केली आहे. या प्रस्तावाला पालिकेच्या गटनेत्यांची मंजूरी मिळाली असून  आता मुंबईत लवकरच  फिरती शौचालये उपलब्ध होणार आहेत.
फिरती शौचालये घेणे खूपच खर्चिक आहे. ही अत्यावश्‍यक सेवा असूनही ती मिळविण्याची कार्यपध्दत किचकट आहे. त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतो. या शौचालयांसाठी प्रमुख अभियंता किंवा उपप्रमुख अभियंता घनकचरा व्यवस्थापन यांच्या परवानगीने प्रतिदिनी शुल्क 4392 रुपये, वाहतूक खर्च आणि अनामत रक्कम प्रत्येकी तीन हजार रुपये असे एकूण 10 हजार 392 रुपये इतका खर्च येतो. समारंभाच्या ठिकाणी फिरत्या शौचालयांची व्यवस्था करण्यासाठीही आयोजकांसाठी ही खर्चिक बाब आहे. झोपडपट्ट्या तसेच सार्वजनिक निकडीच्या ठिकाणीही ही समस्या आहे. तेथे ही सेवा उपलब्ध करणे खर्चिक आहे. ही खर्चिक बाब सर्वसामान्य नागरिकांना व गरीब जनतेला परवडण्यासारखी नाही. त्यामुळे झोपडपट्ट्या आणि अत्यावश्‍यक सार्वजनिक ठिकाणी मोफत फिरती शौचालये उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शिवसेनेचे नगरसेवक अनंत (बाळा) नर यांनी केली होती . 

Post Bottom Ad