बेस्टच्या कामकाजावर लेखा परीक्षण अहवालात ताशेरे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 July 2014

बेस्टच्या कामकाजावर लेखा परीक्षण अहवालात ताशेरे

बेस्ट मध्ये बैठकीत बेस्ट उपक्रमाच्या सन २०११ - १२ च्या लेखा परीक्षण अहवालावर चर्चा करण्यात आली. यावेळी बेस्टच्या कामकाजावर महापालिकेच्या मुख्य लेखा परीक्षकांनी ताशेरे ओढले असल्याने उपक्रमाच्या कामकाजात मोठे बदल करावे अशी मागणी बेस्ट समिती सदस्यांनी यावेळी केली. 
सन २०११ -१२ मध्ये बेस्टची तुट ३३७७. ६६ कोटी इतकी होती. यावेळी बेस्ट वरील कर्ज १०७८ कोटी होते , त्यात वाढ होऊन १६०० कोटी पर्यंत पोहचले आहे . यामुळे बेस्टच्या कामकाजात जोमाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे नोंद करण्यात आल्याचे सुनील गणाचार्य यांनी सांगितले.   

बेस्टमध्ये बांधकाम व्यावसायिकांना देण्यात येणाऱ्या तात्पुरत्या वीज जोडणीमुळे मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याचा आरोप गणाचार्य यांनी केला . बेस्टच्या दक्षता पथकाचा वापर वेगवेगळ्या कारणांन साठी केला जात असल्यामुळे उपक्रमाचा महसुल गोळा  करण्याकडे दुर्लक्ष्य होत आहे. असेहिते यावेळी म्हणाले.  

बेस्टमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने कित्येक बसेस डेपोमध्ये उभ्या राहतात. या उभ्या राहणाऱ्या ७४६ बसेस मुळे उपक्रमाला १९९ कोटी रुपयांचा  महसुल कमी मिळत आहे, असा  महसुल मिळवण्याची संधी बेस्ट उपक्रम गमावत आहे. तसेच बेस्ट डेपोमधील जागांच्या एफ एस आई चा गैर वापर होत असल्याचा आरोपही गानाचार्यांनी केला. 

१९८२- ८३ पासून लेख विभागाच्या टीपन्न्यांवर कारवाई केली गेली नाही. यामुळे टिपण्या मध्ये वाढ होत असल्याचे हि गणाचार्य यांनी सांगितले. तर शिवाजी सिंह यांनी अशा महत्वाच्या विषयासाठी सदस्यांनी आधी कळवावे व नंतरच विषय समितीमध्ये आणावा अशी मागणी केली. 

यावर बेस्टचे महाव्यवस्थापक ओ पी गुप्ता यांनी जुन्या टिपण्या मार्गी लावण्याचे काम सुरु आहे. २०११-१२ चा अहवाल आज मंजूर केला जात आहे . १२-१३ चा अहवाल प्रिंटींग ला गेला आहे. सन २०१०-११ नंतर टिप्पणी कमी करण्यात प्रशासनाला यश आले असून जुन्या टिप्पणी निकाली काढणार आहे . 

Post Bottom Ad