कुपोषणमुक्त महाराष्ट्रासाठी पथदर्शी प्रकल्प मैलाचा दगड ठरेल – वर्षा गायकवाड - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 July 2014

कुपोषणमुक्त महाराष्ट्रासाठी पथदर्शी प्रकल्प मैलाचा दगड ठरेल – वर्षा गायकवाड

मुंबई कुपोषण हा बालकांचे जीवनमान, वाढ व शारीरिक व मानसिक विकास यांना सर्वात मोठा धोका आहे. नंदूरबार जिल्ह्यात बालकांना कुपोषणमुक्त करण्यासाठी पथदर्शी प्रकल्प सुरू केल्याने मला अतिशय आनंद झाला असून हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास महिला व बालकल्याणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाने जमशेटजी टाटा ट्रस्ट आणि युनीसेफ यांच्या समवेत कुपोषित बालकांना दर्जेदार सेवा पुरविण्याविषयी पथदर्शी प्रकल्पासाठी सामंजस्य करार केला आहे. या सामंजस्य करारावर महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव उज्ज्वल उके, टाटा ट्रस्टचे कार्यकारी विशस्त आर. व्यंकटरामन व युनीसेफ इंडियाच्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यालयाचे प्रमुख लुईस अर्सेनाँल्ट यांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या राजेश्वरी चंद्रशेखर यांनी महिला व बालविकास मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत या करारावर महिला ब बालकल्याणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांच्या उपस्थित आज सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या कार्यक्रमात स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

कुपोषणाची गंभीर समस्या असणाऱ्या महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात कालबद्ध व गुणवत्ता प्रदान आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी सुरू केलेला हा प्रकल्प राज्यातील बालकांच्या आरोग्याच्यादृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रातील कुपोषणग्रस्त आदिवासी भागाला केंद्रस्थानी ठेऊन तयार करण्यात आला आहे. हा प्रकल्प म्हणजे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मा. वर्षा गायकवाड यांनी एकत्रितरित्या तयार केलेल्या पाच कलमी योजनेची फलनिष्पत्ती आहे. नंदूरबार जिल्ह्यातील प्रकल्प हा महाराष्ट्र अलायन्स अगेंस्ट मालन्यूट्रीशन या कुपोषणमुक्तता अभियानाखाली 2013 मध्ये व्यापक स्तरावर कुपोषणमुक्ततेसाठी उचललेल्या पावलांचा एक भाग आहे. या उपक्रमाद्वारे राजकीय पक्ष, उद्योग समूह, शैक्षणिक संस्था, प्रसारमाध्यमे या सर्व भागदारांना एका छताखाली आणणारे व्यासपीठ पुरविण्यात आले आहे.

Displaying tatamalnutritionmeetingvarshagaikwad2.jpg

Post Bottom Ad

JPN NEWS