संगीत क्षेत्रात पालिकेने लौकिक मिळवावा - नितीन देसाई - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 July 2014

संगीत क्षेत्रात पालिकेने लौकिक मिळवावा - नितीन देसाई

शिक्षण क्षेत्रातून विविध क्षेत्रात व्यक्ती आज पुढे येत आहेत. पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे नसतात. पालिकेच्या संगीत क्षेत्रातही या स्टुडिओच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी मोठे होणार आहेत. संगीत क्षेत्राला व्यावसायिक स्वरूप आलेले आहे. पालिकेच्या या स्टुडिओलाही व्यावसायिक स्वरूप देऊन संगीत क्षेत्रात पालिकेने आपला लौकीक मिळवावा. पालिकेने नव्याने सुरू करण्यात आलेल्या या स्टुडिओसाठी जेव्हा-जेव्हा गरज पडेल तेव्हा आपण मदतीसाठी तयार असल्याचे प्रतिपादन कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी केले. ग्रँट रोड येथील पालिकेच्या रेकॉर्डिंग स्टुडिओचे पुनरुज्जीवन कार्यक्रमा दरम्यान देसाई बोलत होते.

गेली दोन वर्षे बंद असलेले ग्रँट रोड येथील रेकॉर्ड स्टुडिओचे पुनरुज्जीवित करण्यात आले आहे. नव्या स्वरूपात अत्याधुनिक टच देण्यात आलेल्या या स्टुडिओचे उद््घाटन शिक्षण समितीचे अध्यक्ष विनोद शेलार यांच्या हस्ते करण्यात आले. अत्याधुनिक अशा रेकॉर्डिंग स्टुडिओच्या माध्यमातून महापालिकेच्या विद्यार्थ्यांना संगीत क्षेत्रात विशेष रुची निर्माण करून संगीत शिक्षणाची आवड निर्माण व्हावी या हेतूने या स्टुडिओचे नव्याने पुनरुज्जीवन केले आहे. याकामी संबंधितांनी केलेल्या कार्यवाहीबद्दल शिक्षण विभागाच्या सर्व अधिकार्‍यांचे त्यांनी कौतुक केले. मेहनत व कष्ट या अविरत चालणार्‍या प्रक्रियेमुळे मनुष्य परिपक्व होतो, त्यासाठी संगीत विभागाने या स्टुडिओच्या माध्यमामधून संगीत क्षेत्रात कीर्तीवंत विद्यार्थी घडविण्याचे आवाहन या वेळी शेलार यांनी केले.

Post Bottom Ad